सलमान खानचा ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’ जगभरात पाहिला जात आहे. इतिहासात प्रथमच असे घडले आहे की, सलमान खानचा एखादा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात रिलीझ झाला नाही, परंतु दुबईपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत या चित्रपटाने पहिल्या आणि दुसर्या दिवशी सरासरीपेक्षा चांगली कमाई केली आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, ‘राधे: योर मोस्ट वॉंटेड भाई’चे दुसर्या दिवशीचे परदेशी बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पहिल्या दिवसापासून ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया बॉक्स ऑफिसच्या दुसर्या दिवसाच्या अहवालानुसार, ६९ स्क्रीनचे कलेक्शन ७४,९६६ डॉलर म्हणजेच ५४.९३ लाख झाले आहे. न्यूझीलंडमध्ये २६ स्क्रीनचे कलेक्शन १३,६०७ डॉलर म्हणजेच ९.९७ लाख झाले आहे. एकूणच ६४.९ लाखांचा व्यवसाय झाला, तर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया बॉक्स ऑफिसवर हा आकडा ४८.७०६ डॉलर म्हणजेच ३५.७७ लाख झाला. तसेच, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये वाढ पाहायला मिळाली.
त्याचवेळी युएईमध्येही सलमान खानची जादू पाहायला मिळाली. युएईमध्ये पहिल्या जागतिक प्रीमिअरच्या वेळी, सलमान खानच्या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने ४० लाख डॉलर म्हणजेच २.८४ कोटींची कमाई केली आहे.
जवळपास एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, अखेर ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ ईदच्या निमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. भारतात हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीझ झाला नाही. मात्र, परदेशात पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सलमानची ताकद पाहायला मिळाली. हीच परिस्थिती दुसर्या दिवशीही कायम राहिली.
भारतात सलमान खानचे वेड इतके आहे की, १३ मे रोजी दुपारी १२ वाजता प्रीमियरच्या वेळी, सुमारे १.५ दशलक्ष युजर्सने लोकांनी झी ५ वर लॉगिन केले होते. ज्यामुळे जास्त ट्रॅफिक झाल्याने झी ५ चा सर्व्हर क्रॅश झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा
-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी










