खूप छान! राधे चित्रपटाच्या निर्मात्यांची मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय


कोरोना महामारीने सगळीकडे भयाण वातावरण आहे. जो तो आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे. सगळीकडे मृत्यूचे तांडव बघायला मिळत आहे. सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना उपचाराकरता बेड मिळत नाहीये. आरोग्य यंत्रवेवर खूप मोठा ताण पडत आहे. सामान्य लोक तसेच अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. दरम्यान, सलमान खानच्या ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाने मोठी घोषणा केली आहे.

बेड्स, औषधे आणि ऑक्सिजन मिळत नसल्याने खळबळ उडाली आहे. बरेच लोक मदतीसाठी पुढे येत आहेत, पण ते पूर्ण होत नाही. कोरोना संकटाशी झगडणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी सलमान खान चित्रपट आणि झी मनोरंजन एंटरप्राईझ यांनी चित्रपटातील कमाई लावण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, “देश एक अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाच्या लढाईला मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार आहोत. आम्ही केवळ आपल्या प्रेक्षकांना अपवादात्मक मनोरंजन देण्यावर विश्वास ठेवत नाही, तर देशभर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अर्थपूर्ण, आणि केंद्रित प्रयत्नातही पुढे जात आहोत. आम्हाला आशा आहे की, राधे चित्रपटाच्या प्रदर्शनातून येणारे उत्पन्न, साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी संसाधने उपलब्ध करुन देईल.”

या साथीने बाधित झालेल्या, रोजंदारीवरील कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे, वचनही दोन्ही कंपन्यांनी दिले आहे. सलमान खान चित्रपटाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “या महान उपक्रमाचा भाग म्हणून, आम्हाला आनंद झाला आहे, जेणेकरुन आम्ही कोरोनाच्या विरोधात देशाच्या लढाईत थोडे योगदान देऊ शकू.”

हा सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट १३ मेला ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रदर्शित झालेली गाणी, आजकाल खूप मनोरंजन करत आहेत. ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात सलमान खानसह दिशा पाटनी, रणदीप हूडा, आणि जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.