‘साहेबांचा ऍटिट्यूड तर बघा!’ पॅपराजीला इग्नोर केल्यामुळे नेटकऱ्यांनी किंग खानला धरलं धारेवर


बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान सध्या रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पण तो कधीच सोशल मीडियापासून दूर राहिला नाही. बर्‍याच काळापासून त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण शाहरुख कधी जाहिरातींसाठी, कधी तर कधी त्याच्या पोस्टसाठी चर्चेत राहीला असतो. शाहरुखने आतापर्यंत आपल्या कर्तृत्वाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा शाहरुख खान चर्चेत आला आहे. अभिनेता एक नव्हे, तर दोन प्रोजेक्टसह रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. चाहते ‘पठाण’ चित्रपटाची तर वाट पाहतच आहेत. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, तो पुण्यात तमिळ चित्रपट निर्माता अटलीच्या आगामी प्रकल्पाचे शूटिंग करत आहे.

शनिवारीच( २५ सप्टेंबर) शाहरुख खान मुंबईला परतला आहे. त्यावेळी शाहरुखने ब्लॅक हुडी घातली होती आणि यावेळी तो पॅपराजीच्या कॅमेऱ्यांपासून स्वत:ला लपवताना दिसला. त्याचे असे वागणे पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. सर्वांना असे वाटत आहे की, शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटासाठी असे करत आहे. पॅपराजीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन देखील मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला. आर्यनने फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिला. आर्यन आणि शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

अनेकांनी शाहरुखचे कॅमेरासमोर न येणे आणि आर्यनने फोटोसाठी पोझ न दिल्याचे पाहून संताप व्यक्त केला आहे. काही चाहत्यांना त्याचे हे वागणे असभ्य वाटत आहे. त्यांना असे वाटत आहे की, शाहरुख मीडियासमोर अत्यंत उध्दटपणे वागत आहे. यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. कमेंट करताना एक युजरने लिहिले की,“जी लोकं इतकी भाव खातात त्यांच्या मागे मिडिया का पळत आहे?” तर दुसर्‍या युजरने लिहिले की,“शाहरुख साहेबांचा ऍटिट्यूड बघा.”

शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर शाहरुख शेवटचा ‘झीरो’मध्ये दिसला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारताना दिसल्या. यानंतर शाहरुख बराच काळ ब्रेकवर होता, पण या दिवसांत तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे, ज्यात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच


Leave A Reply

Your email address will not be published.