Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागणीवर कैलाश खेर यांनी साेडले माैन; म्हणाले, ‘हिंदू जागृत होत आहे’

भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागणीवर कैलाश खेर यांनी साेडले माैन; म्हणाले, ‘हिंदू जागृत होत आहे’

बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. अशात आता पद्मश्री गायक कैलाश खेर यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आणि आपले मत मांडले काय म्हणाले प्रसिद्ध गायक? चला जाणून घेऊया…

खरे तर, गेल्या अनेक महिन्यांपासून धीरेंद्र शास्त्री (dhirendra shastri) भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी सातत्याने करत आहेत. दरम्यान, कैलाश खेर (kailash kher) एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंदूरला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हेही सहभागी झाले होते. कार्यक्रमात कैलाश खेर यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडत सांगितले की, “धीरेंद्र शास्त्री यांची एकापाठोपाठ एक विधाने ज्या पद्धतीने समोर येत आहेत, त्यावरुन हिंदू जागे होत असल्याचे दिसून येत आहे.”

यानंतर कैलाश खेर यांना विचारण्यात आले की, ‘धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दावा करत आहेत.’ यावर तुमचे काय मत आहे? अशात गायकानी या दाव्याचे समर्थन केले आणि भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र असल्याचे सांगितले. पुढे कैलाश खेर म्हणाले की, “जे मन आहे ते भारतासाठी समर्पित आहे जे भारताचे आहे ते सनातनचे आहे.” यावेळी त्यांनी आरआरआर मधील नाटू- नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हे आपले संस्कार आणि महाकालाचा आशीर्वाद आहे की, परदेशीही भारतीय संस्कृतीचा आदर करत आहेत.”असे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचे मत हाेते.

कैलाश खेर यांच्या विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’,’अल्हा के बंदे’, ‘जय जयकार जय जयकार’ यासारखी दमदार गाणे हिंदी सिनेसृष्टीला दिली. (bollywood singer kailash kher supported bageshwar dham dhirendra shastri on hindu rashtra statement )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाज वाटत नाही का’ म्हणत नेटकऱ्यांनी तापसी पन्नूच्या ‘त्या’ नेकलेसवरून घेतली तिची शाळा

‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा