सिने सृष्टीतील लाडकं जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट दिले आहेत. तर आता ते सध्या त्यांच्या राजा शिवाजी या बहुप्रत्यक्षिक चित्रपट बाबत चर्चेत आहेत. तर हा चित्रपट सध्या चर्चेत असून, राजा शिवाजी या भव्य चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च काल झाला आहे. तसेच भव्य ट्रेलर लाँचवेळी अनेक कलाकार उपस्थित होते. तर यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलताना मंचावर भावुक झालेला दिसला. त्यांनी या संपूर्ण प्रवासात दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल अभिषेक बच्चनचे विशेष आभार मानले.
राजा शिवाजी (shivaji)या बहुप्रत्यक्षिक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळीचा रितेश देशमुख याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते मराठीत भाषण देताना दिसले. त्यांनी या संपूर्ण प्रवासात दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल अभिषेक बच्चनचे विशेष आभार मानले. या स्टार-स्टडेड कार्यक्रमात संजय दत्त आणि विद्या बालन यांसारखे सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते, जे रितेशच्या शब्दांनी खूप भावूक झालेले दिसले. तसेच या संपुर्ण टिमचे आभार मानले.
रितेशला रडताना पाहून, त्याची पत्नी आणि चित्रपटाची निर्माती, जेनेलिया देशमुख, सुद्धा भावुक झालेली या प्रसंगी दिसली.
जेनेलिया पारंपरिक लुक अगदी सुंदर दिसत होता. तिने गुलाबी नऊवारी साडी, नथ आणि गजरा घालून खूपच सुंदर दिसत होती जे चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्व दर्शवत होते.’राजा शिवाजी’ची निर्मिती जिओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी केली आहे. तर हा चित्रपट 1 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणवीर-दिपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, दिपिकाने शेअर केली गुडन्यूज










