Monday, July 1, 2024

जेनेलियापासून ते ट्विंकलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम, आमिर खानच्या अभिनेत्रीचाही समावेश

चित्रपटसृष्टीत असे मानले जाते की, अभिनेत्रींची फिल्मी कारकीर्द लग्नानंतर संपते. परंतु ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, अनुष्का शर्मा यांसारख्या काही अभिनेत्री त्याला अपवाद आहेत, ज्यांनी लग्नानंतरही भरपूर यश मिळवले आहे. त्याचबरोबर काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपली प्रख्यात कारकीर्द अभिनय सोडल्यानंतर विवाहित जीवनात पूर्णपणे मग्न झाल्या. याच अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया…

ट्विंकल खन्ना
बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये रिलीझ झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. ट्विंकल खन्नाने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००१मध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने चित्रपटात काम करणे सोडले.

सोनाली बेंद्रे
शाहरुख खान, सलमान खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूड सुपरस्टार्सबरोबर काम करणारी सोनाली बेंद्रे यांनी १९९४मध्ये बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. तिने २००२ मध्ये दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केले, आणि बॉलिवूड फिल्म जगताला निरोप दिला.

असिन
बॉलिवूड अभिनेत्री असिनने २००८ मध्ये आमिर खानसमवेत रिलीझ झालेल्या सुपरहिट ‘गजनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमाकेदर पदार्पण केले होते. असिनने अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. २०१६मध्ये असिनने मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्माशी लग्नानंतर चित्रपट कारकीर्द सोडली.

जेनेलिया डिसूझा
अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने २००३ मध्ये रिलीझ झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१२ मध्ये रितेश देशमुखशी लग्नानंतर जेनेलिया डिसूझाने चित्रपट कारकीर्द सोडली. तिने जरी चित्रपट कारकिर्दीला राम राम ठोकला असला, तरी पण ती अनेकदा सोशल मीडियाच्या माद्यमातून धमाल करताना दिसते.

मीनाक्षी शेषाद्री
सनी देओल, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचा चित्रपट दामिनी हा कोणीच विसरू शकत नाही. या चित्रपटातील मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले. त्यांच्या कारकीर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर, मीनाक्षी यांनी चित्रपट कारकीर्द सोडत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाल्या.

सायरा बानो
सायरा बानो या ६० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री होत्या. १९५९ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या 22 व्या वर्षी दिलीपकुमार यांच्याशी लग्न करून, त्यांनी बॉलिवूडमधून निवृत्ती घेतली.

भाग्यश्री
भाग्यश्रीने सलमान खानबरोबर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी हिमालय दासानी यांच्याशी लग्न केले, आणि चित्रपटाला निरोप दिला.

नर्गिस दत्त
नर्गिस दत्त ५० आणि ६० च्या काळातील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होत्या. ‘मदर इंडिया’मध्ये त्यांच्या दमदार अभिनयापासून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती, पण सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटाच्या दुनियेतून माघार घेतली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार राजेश खन्ना यांनी बिग बींचा अपमान केल्यानंतर, जया बच्चन यांनी दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन!’ चित्रपटांपेक्षाही अधिक वादांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री स्वरा भास्कर, पाकिस्तानला म्हणाली होती, ‘अपयशी…’

-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’

हे देखील वाचा