सुपरस्टार राजेश खन्ना यांनी बिग बींचा अपमान केल्यानंतर, जया बच्चन यांनी दिले होते सडेतोड प्रत्युत्तर


बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना आज भलेही आपल्यासोबत नसतील, पण अजूनही प्रत्येकाच्या मनात ते जिवंत आहेत. त्यांचा अभिनय आजही सगळ्यांच्या मनात रुजून आहे. राजेश खन्ना यांनी यांच्या करिअरमध्ये बॅक टू बॅक १५ सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्याचे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच मोडू शकले नाही. परंतु अमिताभ यांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाल्यावर राजेश खन्ना यांची लोकप्रियता जरा डगमगायला लागली होती. असं म्हणतात की, राजेश खन्ना बिग बींवर चिडू लागले होते. एकदा तर त्यांनी अमिताभ बच्चन यांचा अपमान देखील केला होता, ज्यामुळे जया बच्चन या खूपच नाराज होत्या. शुक्रवारी (९ एप्रिल) जया बच्चन आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ९ एप्रिल, १९४८ रोजी जबलपूर येथे झाला होता. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त तोच किस्सा आज आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये अनेक नावाजलेले कलाकार होते. त्यावेळी राजेश खन्ना हे यशाच्या पायऱ्या चढत होते. त्यांच्या चित्रपटाची दमदार कहाणी, शानदार अभिनय, त्यांचे हावभाव यामुळे त्यांचे चित्रपट सुपरहिट होत असे. पण जेव्हा अमिताभ बच्चन यांची एंट्री झाली, तेव्हा त्याचा अँग्री यंग मॅनच्या रोलमध्ये प्रेक्षक त्यांना खूपच प्रेम देऊ लागले.

अमिताभ बच्चन यांना हळूहळू चांगलेच यश मिळायला लागले, पण दुसरीकडे त्यांच्या आणि जया बच्चन (भादुरी) यांच्या प्रेमाच्या गोष्टींची चर्चा सर्वत्र पसरू लागली. १९७२ मध्ये बावर्ची या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिग बी आपल्या अनेक मित्रांसोबत जया यांना भेटायला सेटवर येत असत. राजेश खन्ना हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते, आणि जया ही त्यांची नायिका होती.

असं म्हणतात की, अमिताभ बच्चन यांचं यश राजेश खन्ना यांच्या डोळ्यात खुपायला लागले होते, आणि ते बिग बींवर जळायले लागले होते. त्या दोघांची बावर्ची या चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. तिथे त्यांनी बिग बींबद्दल अपमानकार वक्यव्य केले होते. या गोष्टीचा जया बच्चन यांना खूप राग आला होता, आणि त्यांनी राजेश यांना खूप झापलं होतं.

त्यावेळी जया राजेश खन्ना यांना म्हणाल्या होत्या की, “एक दिवस हे संपूर्ण जग बघेल की, हा व्यक्ती किती मोठा कलाकार बनणार आहे.” जया यांनी बोललेल्या या सर्व गोष्टी खऱ्या झाल्या. हळूहळू अमिताभ बच्चन हे आपल्या अभिनयाच्या जोरावर एक मोठे सुपरस्टार झाले. परंतु राजेश खन्ना यांच्या करिअरची गाडी मात्र रुळावरून खाली घसरू लागली. राजेश खन्ना यांचे सगळे चित्रपट फ्लॉप होऊ लागले.

अमिताभ बच्चन यांचे जया यांच्याशी सन १९७३ मध्ये लग्न झाले होते. त्यांना अभिषेक आणि श्वेता असे दोन अपत्य आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विवादात सापडलेला ‘निशब्द’ चित्रपट; कमी वयाच्या अभिनेत्री सोबतच्या बोल्ड दृश्यांमुळे बिग बींवर नाराज होत्या जया बच्चन!

-जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जयाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर मारली होती रेखाला कानाखाली, बघतच राहिले होते सर्वजण

-केवळ ‘त्या’ व्यक्तीमुळे अमिताभ-जयाच्या बच्चनच्या नात्यात लग्नानंतरही आला होता दुरावा!


Leave A Reply

Your email address will not be published.