Saturday, June 29, 2024

बाप-लेकासाेबत ‘या’ अभिनेत्रीनं रुपेरी पडद्यावर केला हाेता राेमान्स, वाचून तुम्हालाही हाेईल ‘धकधक’

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करत आहेत. यामध्ये सलमान खान ते अक्षय कुमार यांसारख्या प्रसिद्ध स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. पण, अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्या आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत काम करताना दिसतात. तरीदेखील आताचा काळ बदलत आहे. कारण, आजकाल अनेक अभिनेत्री मोठ्या पडद्यावर त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना दिसतात. पण, तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल माहिती आहे का, ज्यांनी अभिनेत्यासोबत काम केल्यानंतर त्याच्या मुलासोबतही काम केले आहे. या यादीत बरीच नावे असली तरी आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितबद्दल सांगत आहोत. जिणे आधी अभिनेत्यासोबत आणि नंतर त्याच्या मुलासोबत काम केले.

माधुरी दीक्षित (madhuri dixit) हिने विनोद खन्ना (vinod khanna) आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांसोबत काम केले आहे. माधुरीने 1988 मध्ये आलेल्या ‘दयावान’ चित्रपटात विनोद खन्नासोबत काम केले होते. या चित्रपटाची एका गाण्यामुळे खूप चर्चा झाली होती. ते गाणं म्हणजे ‘आज फिर तुम पे प्यार आया है’, ज्यामध्ये माधुरी आणि विनोद खन्ना यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. दोघांच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा झाली, एकीकडे काहींनी त्यावर टीका व्यक्त केली, तर काहींनी आश्चर्यही व्यक्त केले. कारण, हे सीन्स त्या दिवसांसाठी खूपच बोल्ड सीन्स होते.

दयावानमध्ये विनोद खन्ना यांनी शक्ती वेलूची भूमिका साकारली होती, तर माधुरीने नीलूची भूमिका साकारली होती. या चित्रपटातली विनोद खन्ना-माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यानंतर माधुरीने विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबतही खूप रोमान्स केला. दोघांनी 1997 मध्ये आलेल्या ‘मोहब्बत’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यामध्ये माधुरी आणि अक्षय मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अक्षय-माधुरीवर चित्रित केलेले ‘ओ बेबी डोंट ब्रेक माय हार्ट’ हे गाणे त्या काळात खूप प्रसिद्ध झाले हाेते.

madhuri-dixit

माधुरी दीक्षितबद्दल बोलायचे झाले, तर तिने 1984 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अबोध’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण, तिला खरी ओळख 1988 मध्ये ‘तेजाब’मधून मिळाली, ज्यामध्ये ती अनिल कपूरसोबत दिसली होती. माधुरी ही 90च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिच्या काळात सर्व सुपरस्टार्ससोबत काम केले आणि एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले.(bollywood actress madhuri dixit worked with actor vinod khanna in dayavan and shared screen with son akhaye khanna in mohabbat triangle love story leaves everyone surprised)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘या’ दिग्गज संगीतकाराने भर कार्यक्रमात केली पत्नीला मातृभाषेत बोलण्याची विनंती, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

आनंदाची बातमी! टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिका इस प्यार को क्या नाम दूं फेम ‘हा’ अभिनेता झाला बाबा

हे देखील वाचा