Thursday, July 18, 2024

रणबीरच्या ‘या’ 5 चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई, ‘ब्रह्मास्त्र’ मोडेल का रेकॉर्ड?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र चित्रपटच्या रिलीजचा काउंटडाउन सुरु झाला आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. रणबीरचा मागील शमशेरा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता येईल अशी अपेक्षा आहेत. पण बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या रणबीर कपूरच्या पाच चित्रपटांचा रेकॉर्ड तो मोडू शकेल का? चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल……

संजू
या यादीत पहिले नाव 2018 मध्ये आलेल्या संजय दत्तच्या बायोपिक चित्रपट ‘संजू’चे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 34.75 कोटींची कमाई केली आणि शानदार ओपनिंग केली.

बेशर्म
2013 साली आलेला ‘बेशरम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी पहिल्याच दिवशी त्याने 21.56 कोटींची बंपर कमाई केली होती.

ये जवानी है दिवानी
रणबीर कपूरच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 चित्रपटांमध्ये ‘ये जवानी है दिवानी’चे नावही सामील आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 19.45 कोटींचे कलेक्शन केले होते.

तमाशा
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी पहिल्या दिवशी 10.94 कोटींचे कलेक्शन केले होते.

ब्रह्मास्त्र पहिल्या दिवशी किती कमाई करेल?
ब्रह्मास्त्र हा मल्टीस्टारर आणि बिग बजेट चित्रपट आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय आहेत. वृत्तानुसार, हा चित्रपट सुमारे 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रणबीरच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 चित्रपटांमध्ये तो कुठे स्थान मिळवतो हे पाहावे लागेल. ती या चित्रपटांचा विक्रम मोडू शकेल का? असा प्रश्न आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आगमन गणपत्ती बाप्पांचं! ‘ही’ गाणी वाजलीच पाहिजेत
स्टनर! नोराचा ग्लॅमरस लुक…
रोमांन्स, सस्पेंन्सचा थरार! चुकूनही पाहायला चुकवू नका ‘या’ पाच वेबसिरीज

हे देखील वाचा