Monday, July 15, 2024

रोमांन्स, सस्पेंन्सचा थरार! चुकूनही पाहायला चुकवू नका ‘या’ पाच वेबसिरीज

ओव्हर द टॉप म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म सध्या लोकांची पहिली पसंती बनले आहे. या डिजिटल युगात लोक सिनेमापेक्षा ओटीटीला जास्त महत्त्व देत आहेत. याचे कारण म्हणजे या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला मजबूत कंटेंट. पण हा कंटेंट लोकांसाठी मोफत उपलब्ध झाल्यावर काय बोलावे. MX Player वर अशा अनेक जबरदस्त वेब सिरीज उपलब्ध आहेत ज्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या पाच वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्यांना आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

आश्रम – अभिनेता बॉबी देओलअभिनीत आश्रम ही MX Player वरील सर्वाधिक पसंतीची वेब सिरीज आहे. या वेब सिरीजमधील बॉबी देओलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या मालिकेचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले होते. आत्तापर्यंत या मालिकेचे ३ सीझन आले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या तिसऱ्या सीझनमध्ये अदिती पोहनकर, ईशा गुप्ता, चंदन रॉय सन्याल, तुषार पांडे, अनुप्रिया गोयंका, दर्शन कुमार, अध्यायन सुमन आणि चित्रा चौधरी यांचा समावेश होता.

क्वीन – 
या वेब सिरीजने लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण केले आहे. या मालिकेची कथा शक्ती शेषाद्रीभोवती विणलेली आहे. या शोमध्ये रम्या कृष्णन मुख्य भूमिकेत दिसली होती. त्याचा अभिनय लोकांना खूप आवडला. ही वेब सिरीज गौतम मेनन आणि पी मुरुगेसन यांनी बनवली आहे.

पवन अँन्ड पूजा –
पवन आणि पूजानेही या यादीत स्थान मिळवले आहे. लोकांना हा शो खूप आवडला. हा एक वेब ड्रामा आहे जो नातेसंबंधांवर आधारित आहे ज्यामध्ये तीन जोडप्यांची कहाणी आहे. महेश मांजरेकर, दीप्ती नवल, शर्मन जोशी, गुल पनाग, तारुक रैना आणि नताशा भारद्वाज यांनी या वेबसिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

रक्तांचल –
या क्राईम बेस्ड वेब ड्रामाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या मालिकेत माफिया राज, टोळीयुद्ध आणि वर्चस्वाची लढाई दाखवण्यात आली आहे. क्रांती प्रकाश झा, निकेतन धीर, रोजनी चक्रवर्ती, विक्रम कोचर, कृष्णा बिश्त आणि रवी खानविलकर यांनी या वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचे दिग्दर्शन प्रीतम श्रीवास्तव यांनी केले आहे.

हेही वाचा –  धक्कादायक! डिस्नेचे कार्यकारी उपाध्यक्ष-निर्माते रॉन लोगन यांचे दुखःद निधन
बेस्ट फिल्म ‘शेरशाह’, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिती सेनन; पाहा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी
बॉलिवूड गाजवणारा अभिनेता ‘राजकुमार राव’ किंग खानमुळेच करू शकलाय पदार्पण; वाचा त्यांच्या प्रथम भेटीचा तो रंजक किस्सा

हे देखील वाचा