Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड ‘ब्रह्मास्त्र’ आधी ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलाय १०० कोटींचा आकडा पार, एकदा यादी पाहाच

‘ब्रह्मास्त्र’ आधी ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलाय १०० कोटींचा आकडा पार, एकदा यादी पाहाच

रणबीर कपूर (Ranveer singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच कारणामुळे चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटीची कमाई केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ब्रह्मास्त्रपूर्वी असे 10 चित्रपट आहेत, ज्यांनी अवघ्या 3 दिवसांत 100 कोटींचा आकडा गाठला होता. यामध्ये केवळ सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांच्याच चित्रपटांचा समावेश नाही तर साऊथ सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटांचाही समावेश आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभासचा 2017 मध्ये आलेला ‘बाहुबली’ या चित्रपटाने अवघ्या 2 ते 3 दिवसात 121 कोटींचा आकडा गाठला होता. अनुष्का शेट्टीसोबतच्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 510.99 कोटी इतके आहे. आमिर खानच्या (Amir khan) ‘दंगल’नेही 3 दिवसात 107 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात आमिरसोबत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 387.38 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

या यादीत रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटाचाही समावेश आहे. परेश रावल आणि सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने 3 दिवसात 119 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 342.53 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 2018 मध्ये आला होता.

सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानेही 3 दिवसात 115 कोटी कमाई केली हाेती. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 339.16 कोटींची कमाई केली होती. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानेही 3 दिवसात 101 कोटींची कमाई केली होती. तर बॉक्स ऑफिसवर 320.34 कोटी रुपयांची कमाई केली होती.

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वार’ या चित्रपटानेही 3 दिवसात 100 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 317.91 कोटींची कमाई केली होती. सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुल्तान’ या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. या चित्रपटाने 3 दिवसांत 105 कोटीची कमाई करून बॉक्स ऑफिसवर 300.45 कोटी कमावलेत.

कॅटरिना कैफ आणि आमिर खानच्या ‘धूम 3’ या चित्रपटानेही केवळ 3 तीनमध्ये 1118 कोटींचा व्यवसाय केला होता. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने 284.27 कोटींची कमाई केली. सलमान खान आणि सोनम कपूर चा ‘प्रेम रतन धन पायो’ 2015 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 101 कोटीचा पल्ला गाठत ग्रँड एन्ट्री केली हाेती. त्याचवेळी बॉक्स ऑफिसवर 210.16 कोटींची कमाई केली. या यादीत शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’चाही समावेश आहे. या चित्रपटाने 3 दिवसात 109 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 203 कोटींची कमाई केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनीने बिकिनीत दाखवला जलवा! फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल
शॉकिंग! अजय देवगण अन् सिद्धार्थ मल्होत्राविरुद्ध गुन्हा दाखल, ‘या’ प्रकरणामुळे आले गोत्यात

हे देखील वाचा