Saturday, April 20, 2024

सुपरस्टार महेश बाबूसोबत झळकणार आलिया, एसएस राजामौलींच्या चित्रपटाचे बजेट पाहूनच बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ब्रम्हास्त्रच्या दमदार यशाने रणबीर आलियाचे जोरदार कौतुक होत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि काही दिवसात 200 कोटी क्लबमध्येही प्रवेश करू शकतो. त्याचवेळी, आता बातमी समोर आली आहे की ‘RRR’ नंतर आलिया भट्ट पुन्हा एकदा एसएस राजामौलीसोबत मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने एसएस राजामौली यांचा चित्रपट साइन केला आहे, ज्यामध्ये ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेटही 800 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार होणार आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर चित्रपटाचे शूटिंग केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आलिया भट्ट लवकरच या जगात तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की एसएस राजामौली महेश बाबूसोबत पॅन इंडिया चित्रपट बनवणार आहेत. राजामौली यांनी अमेरिकेतील एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सांगितले होते की, त्यांचा पुढचा चित्रपट जगभरातील एक्शन अडव्हेंचर असेल. राजामौली आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांप्रमाणेच धमाका करण्यास सज्ज आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.

आलिया भट्ट सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर आलिया रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, आलिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पिरीअडचा आनंद घेताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच आलियाने गुड न्यूज दिली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – बापरे बाप! दुसऱ्यासोबत रोमांन्स करताना सापडली राखी, संतापलेल्या आदिलने केली मारहाण
ब्लॅक ब्युटी! उर्मिला कोठारेचा बोल्ड लूक व्हायरल
जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरणावर येणार चित्रपट ‘या’ दिवशी पोहायला मिळणार मोफत प्रिमियर

हे देखील वाचा