Monday, September 28, 2026
Home › बॉलीवूड › ‘मिर्झापूर द मूवी’चा ट्रेलर झाला प्रदर्शित, गादीसाठी पुन्हा रंगणार रक्तरंजित लढाई

‘मिर्झापूर द मूवी’चा ट्रेलर झाला प्रदर्शित, गादीसाठी पुन्हा रंगणार रक्तरंजित लढाई

सध्या ओटीटीवर चित्रपट आणि सीरीज पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण घर बसल्या अनेक प्रकारचा कंटेट प्रेक्षक पाहु शकतात. याच ऍक्शन, काॅमेडी, ड्रामा, या अनेक प्रकारच्या मालीका चित्रपट यावर आहेत. तर यावरील अनेक सीरीज प्रंचड गाजल्या त्यातीलच एक म्हणजे मिर्झापूर. या सिरीजला प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं आहे. की या सीरीज वर आता ‘मिर्झापूर: द मुव्ही हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. आणि  आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

यातील ट्रेलर पाहताच प्रेक्षकांच्या उस्तुकता शिगेला पोहचले आहे. यात पूर्वांचलच्या सिंहासनासाठीच्या रक्तरंजित लढाईत कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मुन्ना भैय्या यांच्या पुनरागमनाने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच, अनेत चाहत्याच्या कमेंट आले आहेत. यावर एकाने म्हणले आहे की,ट्रेलर अप्रतिम, अपेक्षेपेक्षा खूपच चांगला. तर दुसऱ्यांने म्हणले ‘अवारपन 2’ नंतर बॉक्स ऑफिसवर आणखी काही आश्चर्ये पाहायला मिळतील का? असे अनेक प्रतिक्रिया यावर आले असुन आता प्रेक्षक या चित्रपटांची प्रचंड वाट पाहत आहेत.

यात प्रेक्षकांना दमदार ऍक्शन, सिंहासनाची भूक, रक्तरंजित सूड, पाहायला मिळेल. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच यात पंकज (Pankaj) त्रिपाठी, फजल गुड्डू, दिव्येंदू शर्मा, असे उत्तम कलाकार यात आहेत. तसेच गुरमीत सिंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

हेही वाचा

सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला KIMS रुग्णालयात दाखल केले, डॅक्टरांची टिम ठेवणार बारकाईने लक्ष

हे देखील वाचा