राडा! भावाच्या लग्नात भोजपुरी गायिकेकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; तिच्यासह १०३ लोकांवर एफआयआर दाखल


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायिका आणि अभिनेत्री निशा उपाध्याय ही तिच्या भावाच्या लग्नात कोरोना नियमांचे आणि नाईट कर्फ्युचे उल्लंघन करताना दिसली आहे. हे लग्न शुक्रवारी‌ (2 जुलै) बिहारमध्ये रात्री झाले. बिहार शासनाने लॉकडाऊन हटवले असले, तरीही रात्री 9 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु घोषित केला आहे. नाईट कर्फ्यु आणि कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यामुळे गायिका निशा उपाध्यायसोबत 103 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Case filed against Bhojpuri singer nisha upadhyay flouting corona protocol at brother’e wedding)

या लग्नात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित व्यक्ती सामील झाल्या होत्या. या समारंभात रात्रभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. सगळेच भोजपुरी गाण्यावर डान्स करण्यात आणि मस्ती करण्यात व्यस्त होते. त्यामुळे कोणीच कोरोना नियमांचे पालन केले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यावर गड़खामधील सीओ यांच्या आदेशावरून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या अशा प्रकारची वागणूक म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखेच आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा नाईट कर्फ्यु 6 जुलैपर्यंत असणार आहे.

निशा उपाध्याय ही भोजपुरीमधील एक लोकप्रिय गायिका आहे. तिचे अनेक गाणी सुपरहिट दिली आहेत. तिने ‘रुडा रुडा’, ‘मंगल दिवो’, ‘छोटी छोटी गय्या’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.