Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये ‘या’ जोडप्याच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगूनही वर्षभरातच घेतला घटस्फोट, जाणून घ्या एका क्लीकवर

बॉलिवूडमध्ये ‘या’ जोडप्याच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगूनही वर्षभरातच घेतला घटस्फोट, जाणून घ्या एका क्लीकवर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अफेयर आणि ब्रेकअपच्या चर्चा नेहमी येतच असतात. अशातच कही जोडपे असेही आहेत ज्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या असून आजही त्यांचे नाते टिकून आहे. त्यांना बॉलिवूडची खास जोडींपैकी एक मानले जाते, आणि काही जोडपे असेही आहे ज्यांच्या प्रेमाच्या चर्चातर भरपूर रंगल्या मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. आज आपण अशाच जोडप्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

मनीषा कोईराला आणि सम्राट दहल
मनीषा कोईराला (manisha koirala) ही 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या आयुष्यामध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली. तिच्या अफेयरच्या चर्चा अभिनेता नाना पाटेकर(nana patekar) यांच्यासोबत चांगल्याच रंगल्या होत्या मात्र, यांना लग्न करता आले नाही. काही दिवसांनी मनिषा कोईरला हिने नेपाळचे उद्येगपती सम्राट दहल (samrat dahal) याच्याशी विवाह केला. पम तिच्या नशिबात लग्नाचे सुख नव्हते. लग्नाच्या दोन वर्षानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. आता मनीषा कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढत आहे.

अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन
कल्की कोचलिन ( kalki koechlin) ही आणि अनुराग कश्यप (anurag kashyap) हे दोघेही बॉलिवूडचे कलाकार आहेत. ‘देव डी’ या चित्रपटाच्या वेळी एकत्र आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अुराग करत असून त्याचे एक छोटीशी भूमिकादेखिल निभवली होती. त्यावेळेस यांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आणि 2011 मध्ये यांच्या विवाह झाला. मात्र यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2015 मध्ये यांचे रस्ते वेगळे झाले.

पुलकित सम्रराट आणि श्वेता रोहिरा
बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (pulkit samrat) आणि श्वेता रोहिरा (shweta rohira) यांची जोडी खूपच चांगली होती. बॉलिवूडमध्ये यांच्या प्रेमाच्या चांगल्याच चर्चा रगल्या होत्या. मात्र, यांच्यामध्ये सतत वाद सुरु होते. नवीन जोडपे असून देखिल यांचे वादा सतत पेटत असे. त्यामुळे या दोघांनी लग्नाच्या 12 महिन्यानंतर घटस्फोट घेतला.

राखी सावंत आणि रितेश
ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्यामुळे ओळखली जोते. ती सोशल मीडियावर कोणत्याना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत असते. तिने अचानक रितेश सोबत लग्न करण्याच्या निर्णनयाने सगळ्यांना अश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर ही जोडी बिग बॉस 15 पहायला मिळाली मात्र, हे जोडपे फार काळ एकत्र राहू शकले नाही आणि नंतर त्यांनी आपले रस्ते वेगळे केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एवढ्या राजेशाही घराण्यात जन्म होऊनही सोहाला करावा लागली होती बँकेत नोकरी
कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली श्वेता तिवारी अनेक कठीण गोष्टींचा सामना करत झाली अनेकांची ‘प्रेरणा

हे देखील वाचा