Monday, June 23, 2025
Home मराठी ‘बोले तो पच्चास तोला…!’ श्रेया बुगडेच्या ‘त्या’ फोटोवर उमटल्या कलाकारांच्या प्रतिक्रिया

‘बोले तो पच्चास तोला…!’ श्रेया बुगडेच्या ‘त्या’ फोटोवर उमटल्या कलाकारांच्या प्रतिक्रिया

मराठमोळी कॉमेडियन श्रेया बुगडे हिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिची ओळख निर्माण केली आहे. तिची कॉमेडी, अभिनय, इतर कलाकारांची नक्कल करणे, हे सर्व करून तिने चाहत्यांच्या मनात तिची छाप सोडली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केले जाते.

श्रेया खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली, तर तुम्हाला सहज लक्षात येईल की, तिचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे, ज्यातून तिच्या फॅशन सेन्सचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती गाडीत बसलेली दिसत आहे. यात तिने गुलाबी आणि पांढऱ्या रेषा असलेलं शर्ट घातलं आहे. गुलाबी लिपस्टिक, केसांचा बन आणि डोळ्यावरचा गॉगल, एकंदरीत श्रेयाने असा लूक केला आहे.

या सर्वांव्यतिरिक्त या फोटोमधील आणखी एक गोष्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे, तिने गळ्यात घातलेली सोन्याची चैन. श्रेयाने गळ्यामध्ये सोन्याची अतिशय जाड अशी चैन घातली आहे. यावर आता नेटकऱ्यांच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे कलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

फोटो शेअर करून श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “५० तोळ्यापेक्षा कमी नाही. काय म्हणता!” या फोटोवर कंमेट्स आणि लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. (celebrity reacted on shreya bugde’s latest post)

श्रेयाने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा