Monday, September 16, 2024
Home बॉलीवूड पार्टीच्या जमान्यात ‘या’ कलाकारांनी दारूला आणि सिगारेटला हात देखील नाही लावला, फिटनेसकडे दिले विशेष लक्ष

पार्टीच्या जमान्यात ‘या’ कलाकारांनी दारूला आणि सिगारेटला हात देखील नाही लावला, फिटनेसकडे दिले विशेष लक्ष

बॉलीवूड स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत जवळपास सगळेच सध्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. फिल्म स्टार्स त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या चांगल्या-वाईट सवयींची सर्व माहिती असते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे दारूपासून दूर राहतात आणि पार्ट्यांमध्येही दारूचे सेवन करत नाहीत.

या यादीत बॉलिवूडमधील शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांचे नाव अग्रस्थानी आहे. बिग बी त्यांच्या चित्रपटांमध्ये दारूच्या बाटलीसोबत दिसले असतील आणि त्यांनी मद्यपीची भूमिका केली असेल, परंतु अभिनेता वास्तविक जीवनात दारूला हातही लावत नाही.

बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेसने सर्वांना प्रेरित करणारा अभिनेता जॉन अब्राहमचे (John abrahm) नावही या यादीत सामील झाले आहे. जॉन त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेतो आणि दारूसारख्या गोष्टींचे सेवन टाळतो. अभिनेत्याने आपल्या मुलाखतींमध्येही याचा खुलासा केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द इंडियन फोर्स या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ इंडस्ट्रीत अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी होत असला तरी अभिनेता दारू पिण्यापासून दूर राहतो. पंजाबी कुटुंबातील असूनही अभिनेता दारूला हातही लावत नाही.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) हा फिटनेस फ्रीक आहे. अभिनेता सकाळी लवकर उठतो आणि रोज व्यायाम करतो. अक्षय कोणत्याही पार्टीत जात नाही. यामुळे तो दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांपासून दूर राहतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

#जोगबोलणार, जोगांनी BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी ,पुष्कर जोग म्हणाला,’ केवळ माणुसकी हाच धर्म…’
सिद्धूच्या कॉमेडीने भरलेल्या ‘लग्नकल्लोळ’चा धमाकेदार टिझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा