नेत्याची मुलगी बनणार अभिनेत्री! ‘या’ केंद्रीय शिक्षण मंत्र्याची मुलगी ‘वॉर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री

अभिनेत्यासोबत आजकाल राजकीय नेत्यांची पुढची पिढी देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना दिसत आहे. या राजकीय नेत्यांच्या यादीत केंद्रीय शिक्षण मंत्री ‘रमेश पोखरियाल निशंक ‘यांचं देखील नाव सामील आहे. केंद्रीय मंत्री पोखरियाल यांची मुलगी ‘आरुषी निशंक’ ही लवकरच चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.

आरुषी एका ‘वॉर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, कीर्ती कुल्हारी या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा 6 धैर्यवान महिला अधिकार यांच्या कार्यावर आधारित आहे. या चित्रपटात त्या कोवर्ट ऑपरेशन करत असतात आणि शत्रूच्या सगळ्या चाली उधळून लावतात.

एका म्युझिक अल्बममध्ये देखील असणार आहे आरुषी
या चित्रपटात आरुषी आधी एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. या गोष्टीची माहिती तिने स्वत: तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर दिली आहे. ‘टी सीरिजसाठी तिने ‘रोहित सुचंती’ यांच्यासोबत एक म्युझिक अल्बम देखील शूट केला आहे. टी- सीरिज लवकरच या गोष्टीची घोषणा करणार आहे.

त्यांच्या अधिकाऱ्यांनी या चित्रपटाबाबत म्हटले की, ‘हा चित्रपट महिलांना केंद्रस्थानी ठेवून बनवला आहे. आतापर्यंत वॉर या चित्रपटात नेहमी पुरुष अधिकाऱ्यांची वीरता दाखवली आहे. परंतु या चित्रपटात महिलांची वीरता दाखवण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांची वीरता दाखवण्यासाठी ‘राजी’ हा एकच चित्रपट बनला आहे. पण हा चित्रपट पूर्णत: महिलांवर आधारित आहे. या चित्रपटाचे टायटल आणि बाकी माहिती लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.’

निशंक परिवाराशी जोडलेल्या काही लोकांनी अशी माहिती दिली आहे की, ‘प्रसून जोशी हे देखील या चित्रपटात असणार आहेत. ते स्वत: डोंगरामध्ये राहणारे आणि रमेश पोखरियाल यांच्या जवळच्या संबंधातील आहेत. प्रसून या चित्रपटाला डेव्हलप करत आहेत.’

ट्रेड पंडिता यांनी या चित्रपटाच्या संबंधित आणखी काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत. वॉर या चित्रपटाचे डायरेक्टर ‘आदित्य धर’ हे आहेत. आदित्य धर हे सध्या रॉनी स्क्रूवाला यांची ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाच्या प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत.

हेही वाचा-

ज्या फरदीन खानच्या मागे एकेवेळी दिपीका साईड मॉडेल म्हणून चालली होती, आज त्याच फरदीनला मागे टाकत बनलीय…

Leave A Reply

Your email address will not be published.