ज्या फरदीन खानच्या मागे एकेवेळी दिपीका साईड मॉडेल म्हणून चालली होती, आज त्याच फरदीनला मागे टाकत बनलीय…

बॉलीवूड अतिशय बेभरवशी क्षेत्र आहे. या अजब दुनियेत नेहमी चढत्या सूर्याला नमस्कार केला जातो. येणार प्रत्येक चित्रपट कलाकारांचे नशीब बदलत तो कलाकार हिट किंवा फ्लॉप हे ठरवतो. यात कोणत्या कलाकाराचे कसे आणि कुठे नशीब पालटेल हे कोणालाच माहित नसते. आज सुपरहिट असणारा ऍक्टर उद्या सुपरफ्लॉप सुद्धा होताना या इंडस्ट्रीने पाहिले आहे.

सध्या अशाच संकल्पनेवर आधारित एक फोटो सोशल मीडियावर जोरदार फिरताना दिसत आहे. तो फोटो आहे फरदीन खान आणि दीपिका पदुकोण यांचा. एका मॉडेलिंग शो मध्ये जिथे फरदीन खान शो टॉपर आहे तिथे दीपिका त्याच्या मागे मॉडेलिंग करत आहे. साधारण १५ वर्षांपूर्वीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोवरूनच ही फिल्मी दुनिया किती विचित्र आहे याचा अंदाज लावता येतो.

ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या दीपिकाने शाहरुख सोबत ‘ओम शांती ओम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि बॉलिवूडला मस्तानी मिळाली. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने दीपिकाने सगळ्यांनाच वेड लावले. आज दीपिका हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी लिडिंग लेडी म्हणून ओळखली जाते. एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारत तिच्या अभिनयाची क्षमता तिने सिद्ध केली.

दीपिकाचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दीपिकाने हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा तेरा’ या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. याचवेळी फराह खानने दीपिकाला पहिल्यांदा बघितले आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली.

तर दुसरीकडे १५ वर्षांपूर्वी स्टार असणारा फरदीन आज इंडस्ट्रीतून जवळपास गायब झाला आहे. एकेकाळी नो एन्ट्री, हे बेबी, प्यार तुने क्या किया, ख़ुशी, ऑल द बेस्ट असे अनेक हिट सिनेमे देणारा फरदीन आज कुठेच दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी त्याचा वजन वाढलेला अतिशय विचित्र दिसणारा एक फोटो खूप वायरल झाला होता. आता त्याने फॅट तो फिट असा बदल स्वतःमध्ये घडून आणला आहे. मात्र असे असूनही अजून फरदीनकडे कोणताही सिनेमा नाही.

दीपिकाने तिच्या १३ वर्षाच्या करियरमध्ये ओम शांती ओम, ये जवानी हैं दिवानी, तमाशा, पिकू, बाजीराव मस्तानी, रामलीला, पद्मावती, कॉकटेल, लव्ह आज काल आदी सुपरहिट सिनेमे दिले आहेत. लवकरच दीपिका कबीर खानच्या ‘८३’ सिनेमात मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा-
स्वत: त्या आजाराने एकेवेळी दिपीका होती त्रस्त, आता देशातील त्याच आजारग्रस्तांसाठी चालवते एनजीओ
हैप्पी बर्थडे मस्तानी: जाणून घेऊया मॉडेलिंग ते सुपरहिट अभिनेत्री होण्याचा दीपिकाचा प्रवास

Leave A Reply

Your email address will not be published.