Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड धक्कादायक! चारू असोपा देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव; म्हणाली…

धक्कादायक! चारू असोपा देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव; म्हणाली…

प्रसिद्ध अभिनेत्री चारू असोपा विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असत. चारू असोपाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिची मेहुणी अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. त्या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. आता चारू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

‘कैसा है रिश्ता अंजना सा’ या टीव्ही मालिकेत अभिनेत्री चारूने (Charu Asopa) नकारात्मक भूमिका साकारली आहे. तिला इंडस्ट्रीत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. चारू असोपा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘देवों के देव महादेव’ आणि ‘मेरे अंगने’ सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये चारूने काम केले आहे. मात्र, कोणत्याही गॉडफादरशिवाय या इंडस्ट्रीत स्थान निर्माण करणे सोपे नसल्याचे तिने सांगितले. चारूला अनेक संकटांना सामोरे जावे लागले, परंतु अभिनेत्रीने कधीही तिचे स्वप्न सोडले नाही आणि आपल्या आयुष्यात पुढे जात राहिली.

चारूला मुंबईत राहणं होतं कठीण?
चारू म्हणाली की, “तो खूप आव्हानात्मक काळ होता. मला आठवते की, माझी आई माझ्यासोबत ऑडिशन आणि मीटिंगला यायची. तिने इंडस्ट्रीबद्दल इतकं ऐकलं होतं की, तिला मला एकटं सोडायचं नव्हतं. तेव्हा आम्ही येथे कोणाला ओळखत नव्हतो, म्हणून आम्ही ठरवले की मी संपर्क साधण्यासाठी अभिनय शाळेत जाईन. माझी आई मला शाळेत सोडायची आणि परत घ्यायला यायची. मी तीन महिने कोर्स केला आणि मग मी अभिनय शाळेतून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’साठी ऑडिशन दिली.”

चारूने सांगितले की, मी एका फिल्म मीटिंगसाठी गेले होते आणि एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसच्या निर्मात्याला भेटले. मला त्याचे नाव घ्यायला आवडणार नाही. मी जे बोलतोय ते एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसबद्दल आहे. कास्टिंग डायरेक्टरने माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्ट ठेवला, माझ्या हातात पेन होता. हा एक मोठा चित्रपट होता, पण कास्टिंग डायरेक्टरने जे सांगितले त्यानंतर मला 3 दिवस ताप आला होता.

त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून मी आजारी पडले. मी त्यांना हात जोडून म्हणाले की, तुम्ही जे बोलतोय ते मी करू शकणार नाही. त्यांनी मला सांगितले की ठीक आहे, तुम्ही नाही केले तर बाहेर बसलेल्या मुली करतील… मी त्यांना म्हणाले, सर, ठीक आहे, पण कृपया तुम्ही हा करार मागे घ्या. (Charu Asopa also had the harrowing experience of the casting couch)

अधिक वाचा- 
परी म्हणू की सुंदरा! सनीच्या मादक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहाच
रितेश-जिनिलियाचा विषयचं खोल! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ‘वेड’ चित्रपटाने केली विक्रमाची नोंद

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा