Saturday, March 2, 2024

Ashok Saraf | अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Ashok Saraf | अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांना नेहमीच हसवत ठेवणारे, आपले सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची एक विशेष अशी ओळख निर्माण केलेली आहे. आणि आता त्यांच्या या कारकिर्दीमुळे त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी 2023 या वर्षाच्या मानाचा महाराष्ट्र भूषण देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून अशोक सराफ यांचे अभिनंदन देखील केलेले आहे.

Ashok Sarafa'

अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत अनेक विनोदी तसेच गंभीर स्वरूपाच्या भूमिका साकारले आहेत. एवढेच काहीतरी अगदी खरं नाही की भूमिका साकारून त्यांनी त्यांच्या विविध कलांचे दर्शन त्यांच्या अभिनयातून घडवले आहे. आणि प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार जाहीर करताना केले आहे.

अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सगळ्या प्रेक्षकांना तसेच त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि सोशल मीडियावर सगळेच त्यांना अभिनंदन करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शाहरुख खानसोबत कोलॅबोरेट करणार KGF फेम यश? यशच्या बाॅलिवूडमधील दुसऱ्या चित्रपटाची चर्चा!
#जोगबोलणार, जोगांनी BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी ,पुष्कर जोग म्हणाला,’ केवळ माणुसकी हाच धर्म…’

हे देखील वाचा