विनोदी अभिनेता ‘कपिल शर्मा’ हा ‘कॉमिडी नाइट्स विथ कपिल शर्मा शो’ या रिऍलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या विनोदाने सर्वाना खळखळून हसवत असतो. त्याची विनोदी बुद्धीमुळे तो ओळखला जातो. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘ज्विगाटो’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबई मध्ये या चित्रपटाचा ग्रँड सोहळा पार पडला. हा चित्रपट साऊथ कोरियामधील ‘बुसान’ या शहरातील फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात आला. त्याबद्दल कपिलने एक अनुभव सांगितला.
2013 मध्ये ‘कॉमिडी नाइट्स विथ कपिल शर्मा शो’ (Kapil Sharma) या रिऍलिटी शोमुळे त्याचे आयुष्याला कलाटणी मिळाली. आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यामुळे लोकप्रियता वाढलीच पण तो या शो मुले घराघरात पोहोचला. त्याने प्रेक्षनकांचे मन जिंकले. त्याने या आधी ‘किस किसको प्यार करु’ या चित्रपटात काम केले आहे. पण त्यातली त्याची भूमिका फारशी रुचली नाही. परंतु आता येणाऱ्या त्याच्या चित्रपटाने कहरच केला. त्याचा ‘ज्विगाटो’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट नुकताच साऊथ कोरिया या देशातील बुसान या शहरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला. तेव्हा या चित्रपट पाहिल्यानंतर लोक रडले. त्यावर कपिल म्हणतो की, ‘त्यांना माहितीसुद्धा नाही की मी एक विनोदी अभिनेता आहे. त्यामुळे निराशा होईल असे मला वाटत नाही. यातूनच मला माझ्या कामाची पावती मिळाली.’
‘ज्विगाटो’ या चित्रपटात त्याने एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे आणि त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळयात तो असं म्हणाला की, मी नंदिता दासचा चाहता आहे. जेव्हा एखाद्याने तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कामाने प्रभावित होता तेव्हातुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवता. त्यांच्याकडे ठराविक काम असते. हे म्हणजेच एकाच वर्षी दोन तीन चित्रपट करण्यासारखे नाही” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री आणि दिग्दर्शक ‘नंदिता दास’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कपिल शर्मा बरोबरच गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत.हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे.(comedian-actor-kapil-sharma-new-upcoming-movie-zwigato-trailer-is-out)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…,’
मोठी बातमी! शाहरुख खानची पत्नी ‘गौरी खान’ यांची अडचण वाढणार….लखनऊमध्ये FIR दाखल, नेमक काय आहे प्रकरण?