Saturday, July 27, 2024

किसींग सीन्समुळे निर्मात्यांनी माझा गैरवापर केला; इमरान हाश्मी असं का म्हणाला?

सिरियल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्याच्या चित्रपटांमध्ये इमरान आपल्या किसर बॉयच्या भूमिकेला बगल देत नव्या भूमिकांमध्ये दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला टायगर ३ मध्ये इमरानने खलनायकाची भूमिका साकारली होती. आता पुढेही तो अनेक विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये इमरान किसींग सीन्सपासून लांब पळत असल्याची चर्चा रंगली आहे. तर हो…

इमरानने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या जुन्या भूमिकांसंदर्भात कोही गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून सिनेसृष्टीत एन्ट्री केलेल्या इमरानने ‘मर्डर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये किसींग सीन्स दिले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन चाहत्यांचा बदलला. पण त्याने आता या अशा भूमिकांना बगल द्यायचे ठरले आहे.

मुलाखतीदरम्यान, इमरानला तु किसींग सीन्स द्यायचे बंद का केलेस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना इमरान म्हणाला, हा माझ्या पत्नीचा सल्ला आहे आणि मी तिचं ऐकतो. मी सध्या माझ्या चित्रपटात किसिंग सीन ठेवत नाही. खरंतर आधीपासूनच मला या अशा सीन्सवर आक्षेप घ्यायचा होता, पण माझी ‘सिरियल किसर’ ही प्रतिमा नकळत बनली अन् काही निर्मात्यांनी त्याचा गैरफायदाही घेतला.

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती गोष्ट आवश्यक बनली. मी जेव्हा माझे काही चित्रपट पाहतो तेव्हा मला स्वतःला वाटतं की काही ठिकाणी त्या किसिंग सीनची अजिबात आवश्यकता नव्हती, पण प्रेक्षकांना तेच हवं होतं. मी खरंतर ते चित्रपटाखातर केलं पण शेवटी टीकेचा धनी मलाच ठरवले. अशी खंत इमरानने यावेळी व्यक्त केली.

किसिंग सीनमुळे माझी पत्नी एकेदिवशी वैतागली होती. चिंतेत दिसत होती. पण मी आता ठरवलं आहे की असे सीन्स देणार नाही. पण आता माझा आगामी शोटाईम ही सिरीज पाहून तिला पुन्हा त्रास होईल. विशेष म्हणजे मी हे सीन्स देण्याआधी तिच्याशी चर्चा करतो. तिचा सल्ला घेतो. असे इमरान यावेळी म्हणाला.

इमरानच्या व्रकफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आता लवकरच तो ‘शोटाइम’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये इमरानबरोबरच मौनी रॉय, श्रीया सरन, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मागिल वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट टायगर 3 मध्ये इमरानने खलनायाकाची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

विरुष्काच्या मुलाच्या नावाचा विराटच्या हातावरील टॅटूशी आहे संबंध, जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ
अवॉर्ड सोहळ्यात शाहिदचा झाला ‘मोए मोए’, करिनाने केले…

हे देखील वाचा