‘पद्मश्री’ विजेत्या देविका राणींनी १९३३ मध्ये दिला होता ‘असा’ सीन, पाहून हरपले होते सर्वांचेच भान


सर्व दिवस सारखे नसतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जसा काळ बदलतो, तसे सर्वकाही बदलत असते. असेच काहीसे बॉलिवूडबाबतही आहे. ३०चे दशक आणि आजच्या बॉलिवूडमध्ये खूप काही बदलले आहे. आजकालच्या चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन दाखवणे सामान्य झाले आहे, पण एक काळ असा होता की, नायक-नायिकेतील रोमान्स दाखवून गोंधळ निर्माण करण्यासारखे होते. त्यामुळे बॉलिवूडमधला पहिला किसिंग सीन कोणी केला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

बॉम्बे टॉकीजची मालकीण आणि ३० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री देविका राणी यांची ही गोष्ट आहे, ज्या पडद्यावर नेहमी पुढचा विचार करत राहिल्या. १९३३ सालची गोष्ट आहे, जेव्हा ‘कर्मा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये हिमांशू राय आणि देविका राणी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात त्यांनी सुमारे ४ मिनिटांचा किसिंग सीन दिला होता. मात्र, हा सीन लव्ह मेकिंग सीन नव्हता, तर चित्रपटातील कलाकार बेशुुद्ध असतात आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अभिनेत्री त्यांना किस करते. जरी त्यावेळी प्रेक्षक अशा गोष्टी पाहण्यास तयार नव्हते. हा सीन पाहून प्रेक्षकांचे भान उडाले आणि हा सीन बॉलिवूडच्या इतिहासातील पहिला किसिंग सीन म्हणून नोंदवला गेला.

देविका आणि हिमांशू त्यावेळी खरोखर पती-पत्नी होते. त्यामुळे त्यांना हा सीन करण्यात कोणतीही अडचण आली नाही. ३० मार्च, १९०८ रोजी जन्मलेल्या देविका यांना १९५८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता. तसेच, ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत. १९६९ साली त्यांना हा पुरस्कार मिळाला.

देविका राणी गायच्या उत्तम गाणी
‘अछूत कन्या’ या १९३६ मध्ये आलेल्या चित्रपटात देविका राणी यांनी एका दलित मुलीची व्यथा मोठ्या पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली होती. देविका राणी यांचे गायनही चांगले होते. देविका यांनी स्वतः ‘अछूत कन्या’ मधील गाणे गायले आहे. देविका यांनी आपल्या पतीसोबत बॉम्बे टॉकीज नावाचा स्टुडिओ बनवला, ज्याच्या बॅनरखाली अनेक सुपरहिट चित्रपट आले. विशेष म्हणजे अशोक कुमार, दिलीप कुमार, मधुबाला आणि राज कपूर यांसारख्या कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवात इथूनच झाली. दिलीप कुमार यांना चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय देविका यांना जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली ताबडतोड कमाई

-अर्रर्र! राखी- मिका ते कॅटरिना- राणी, ‘या’ बॉलिवूड कलाकारांचे ऊप्स मोमेंट; पाहून कोणालाही वाटेल लाज

-अजय देवगणच्या ३० वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत अजय झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा


Latest Post

error: Content is protected !!