ऑनस्क्रीन तर सोडाच सोशल मीडियावरही सुरुय ‘दीपवीर’चा रोमान्स, रणवीरच्या फोटोवर दीपिकाची रोमँटिक कमेंट


एनर्जीचे मोठे पॅकेट असणारा सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारा रणवीर नेहमी चर्चेचा विषय असतो. कायम प्रकाशझोतात राहणारा रणवीर वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टीमुळे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतो.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. या दोघांचे प्रेम जगापासून लपलेले नाही. हे दोघं नेहमी सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडियावर त्याचे प्रेम व्यक्त करताना दिसतच असतात. माध्यमांमध्ये नेहमी चर्चेत असणारी ही जोडी माध्यमांसोबतच, फॅन्स आणि इंडस्ट्रीमध्ये देखील भरपूर लोकप्रिय आहे. दीपिका आणि रणवीर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. मात्र, मागील काही काळापासून रणवीर सोशल मीडियावरून गायब होता.

आता रणवीरने एक दमदार पोस्ट टाकत सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. रणवीरने त्याचे नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहे. सीरियस मॅस्क्युलिन लूकमधील रणवीरचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये रणवीर हॉट दिसत असून, त्याच्या या फोटोंवर फॅन्ससोबतच कलाकारदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

या सर्व कमेंट्समध्ये मात्र एका व्यक्तीच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ती व्यक्ती आहे ब्युटीफुल दीपिका पादुकोण. रणवीरची प्रिय पत्नी दीपिकाने त्याच्या या फोटोंवर कमेंट करत लिहिले आहे, “माईन.” याचा अर्थ म्हणजे फक्त ‘माझा.’  या कमेंटसोबतच दीपिकाने तीन ईमोजी देखील पोस्ट केले आहेत. सोबतच अभिनेता अर्जुन कपूरने “स्टॅलियन” म्हणत कमेंट केली आहे.

Photo Courtesy: Instagram/ranveersingh

रणवीर नुकताच मुंबईमध्ये एका नवीनच सिनेमाचे चित्रीकरण करताना दिसला होता. मात्र, तो नक्की कोणत्या सिनेमाचे शूटिंग करतोय हे अजून गुलदस्त्यात आहे. लवकरच या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर येईल. तत्पूर्वी रणवीरचा ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा सिनेमा २०२० मधेच प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर आणि दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.