Tuesday, April 28, 2026
Home बॉलीवूड प्रेग्नेंसी अनाउंसमेंटनंतर पहिल्यांदाच दिसली दीपिका पदुकोण, अन् काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

प्रेग्नेंसी अनाउंसमेंटनंतर पहिल्यांदाच दिसली दीपिका पदुकोण, अन् काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

दीपिका पदुकोण ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. आणि तीने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. तर तिने तिच्या अभिनयातुन अनेक प्रेक्षकाची मने जिंकली आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिची प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट जाणुन घेण्याबाबत उत्सुक असतात. दीपिका पदुकोण काहिच दिवसापुर्वी एक आंनदाची बातमी शेअर केली होती ती म्हणजे तिने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तर दीपिका पदुकोणने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केल्यापासून पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आणि चाहते आतुरतेने वाट पाहत होते. विमानतळावर, या जोडप्याने कॅमेऱ्यासमोर पोज देण्याऐवजी शांतपणे राहणे पसंत केले आणि ते थेट गेटकडे गेले. तिच्या पहिल्या सार्वजनिक हजेरीसाठी, दीपिकाने आराम आणि फॅशनला प्राधान्य दिले. तिने ओव्हरसाईज कोबाल्ट ब्लू रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला होता. आणि त्याला जुळणारी पॅन्ट होती.  या साध्या लुक मध्येही ती अगदी सुंदर दिसत होती. दुसरीकडे, रणवीर सिंग देखील कूल, निवांत दिसत होता. त्याने पांढऱ्या ओव्हरसाईज टी-शर्टसोबत बॅगी मल्टी-पॉकेट कार्गो डेनिम घातली होती आणि काळ्या रंगाचा सनग्लास व क्रॉस-बॉडी बॅगने आपला लूक पूर्ण केला होता.

रणवीर सिंग (singh)विमानतळावर पूर्णपणे संरक्षणात्मक भूमिकेत होता. गाडीतून उतरल्यापासून ते विमानतळात प्रवेश करेपर्यंत, तो सतत दीपिकावर लक्ष ठेवून होता. त्याने तिला गाडीतून उतरण्यास मदत केली आणि आत जाताना तिच्या पाठीमागे काळजीपूर्वक हात ठेवून तिला रस्ता दाखवला. यावरुन असे दिसुन येते की तो अत्यंत काळजी घेणार नवरा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अजय देवगन फंटूश गँगसोबत पुन्हा दिसला, ऊटीतील फोटो व्हायरल, 5 सीट्सची बाईक ठरली चर्चेचा विषय

हे देखील वाचा