Thursday, June 13, 2024

शाहरुख खानसोबत ‘जवान’मध्ये काम करताना दीपिका पदुकोणने केला ‘या’ गोष्टीचा त्याग; म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कोणत्याही ओळखचे गरज नाही. दीपिकाने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाची एक झलक पाहण्यासीठी तिचे चाहते काहीही करण्यास तयार असतात. दीपिकाने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या दीपिका तिच्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. शाहरूख खान आणि दीपिकाचा हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. बाॅक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.

किंग खानच्या चित्रपटाने काही दिवसातच बाहुबली 2 ते KGF सारख्या चित्रपटांना पराभूत केले आहे. आता त्याची नजर ‘गदर 2’ वर आहे, ज्यासाठी ‘जवान’ने जगभरातील विक्रम मोडण्याची तयारी केली आहे. अॅटली दिग्दर्शित या अॅक्शन-ड्रामा चित्रपटात दीपिकाने (Deepika Padukone) ही कॅमिओ केला आहे. तिला आणि किंग खानला एकत्र पाहून चाहत्यांचे चेहरे पुन्हा उजळले. पण तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खानच्या चित्रपटासाठी दीपिकाने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सोडली आहे.

दीपिकाने शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची मैत्री किती घट्ट आहे याचा पुरावा दीपिकाने ‘जवान’ चित्रपटात दिला आहे. करोडो रुपये मानधन घेणाऱ्या दीपिकाने अॅटलीच्या चित्रपटात विस्तारित कॅमिओ करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतलेले नाही.

‘द वीक’सोबतच्या संवाद साधताना दीपिकाला जेव्हा ‘जवान’ चित्रपटातील एका खास भूमिकेसाठी किती फी घेतली, असे विचारण्यात आले तेव्हा तिने या चित्रपटासाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचे उत्तर दिले. ती म्हणाला की, शाहरुख खान आणि रोहित शेट्टीच्या कोणत्याही चित्रपटात स्पेशल अपिअरन्स करायला मी नेहमीच तयार असते. शाहरुख खान आणि दीपिका यांना इंडस्ट्रीत एकमेकांचे लकी चार्म म्हटले जाते. या दोघांनी एकत्र केलेले सर्व चित्रपट सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर ठरले आहेत. (Deepika Padukone gave it up while working with Shahrukh Khan in Jawan)

अधिक वाचा-
‘इंजीनियर्स डे’निमित्त अक्षय कुमारने शेअर केला ‘तो’ फोटो; म्हणाला, ‘धाडसी, बुद्धिमान इंजिनिअर…’
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन ‘या’ डायरेक्टरचे गुणगान गाताना दिसणार, वाचा सविस्तर

हे देखील वाचा