×

‘फ्लॉप चित्रपटाचीही पार्टी असते का?’, ‘गहराइयां’च्या सक्सेस पार्टीमुळे भलतील ट्रोल झाली दीपिका पदुकोण

सध्या चित्रपट क्षेत्रात सर्वत्र दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘गहराइयां’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या शूटिंग पासून, प्रमोशनपर्यंत सतत हा चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत राहिले होते. आता नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी देण्यात आली. ज्यावरून अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या जोरदार ट्रोल होत आहे.

दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडेची (Ananya Panday) प्रमुख भूमिका असलेला ‘गहराइयां‘ चित्रपट पहिल्यापासून चर्चेत राहिला आहे. सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि दीपिका पदुकोणच्या इंटिमेट सीनची यापुर्वी जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रमोशनसाठी फिरताना अनेकदा मस्ती, धमाल करताना दिसून आले होते. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेत असल्याने आणि चित्रपटात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी अशा आघाडीच्या कलाकारांचा सहभाग असल्याने हा चित्रपट चांगलाच गाजणार असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता. मात्र चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी करता आली नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. मात्र अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटाच्या यशावर समाधानी असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तिने या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. याच कारणामुळे आता तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘गेहराइयां’ चित्रपटाची सक्सेस पार्टी आपल्या सह कलाकारांसह साजरी केली. त्यामुळे तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अनेकांनी या पार्टीवर प्रतिक्रिया देत दीपिकाला ट्रोल केले आहे. यामध्ये एका युजरने “फ्लॉप चित्रपटांची पण सक्सेस पार्टी असते का?” असे म्हणत खिल्ली उडवली आहे. तर आणखी एकाने “कोणत्या गोष्टीची सक्सेस पार्टी?” असे म्हटले आहे. दुसर्‍या एका नेटकऱ्याने “फालतू बोल्ड सीन दाखवण्याची सक्सेस पार्टी आहे” असे म्हणत जोरदार ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान या पार्टीत आलेल्या चित्रपटातील कलाकारांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये आलेली अनन्या खूपच मनमोहक दिसत होती. तर आपल्या आलिशान बाइकवर दमदार एंट्री मारत सिद्धांत चतुर्वेदीने जोरदार सगळ्यांना थक्क केले होते.

हेही वाचा – 

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन करणं त्रिधा चौधरीसाठी नव्हतं सोपं, शूटिंगपूर्वी ‘असा’ करायची सराव

लहानपणापासून धोनीसोबत फोटो घ्यायला तरसलाय ‘हा’ दिग्दर्शक, आता त्याच्याच चित्रपटात दिसणार माही!

Wedding | रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा करणार लग्न? अफेअर्सच्या चर्चांनी धरला जोर

 

Latest Post