×

Gehraiyaan | अनन्या पांडेने दीपिका पदुकोणच्या ‘त्या’ सवयीबद्दल केला मोठा खुलासा, ऐकुन तुम्हालाही बसणार नाही विश्वास

सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर शकुन बत्रा यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘गहराइयां’ चित्रपटाची टीम विविध कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी चित्रपटातील कलाकार एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून आले होते. आता अनन्या पांडेने दीपिका पदुकोणबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

दीपिका पदुकोण ही हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिकाच्या चित्रपट आणि अभिनयाइतकीच तिच्या फिटनेसची देखील चर्चा होत असते. सध्या दीपिका तिच्या ‘गहराइयां’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांची मैत्री प्रत्यक्षात सुद्धा पाहायला मिळत आहे. दीपिका आणि अनन्या सध्या चांगल्या मैत्रिणी झाल्या असून दोघीही एकमेकांबद्दल बोलताना दिसत असतात.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

नुकताच अभिनेत्री अनन्या पांडेने दीपिका पदुकोणबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना अनन्याने ‘गहराइयां’ चित्रपटाबद्दल अनेक रंजक गोष्टी आणि किस्से सांगितले. यावेळी सेटवर सगळ्यात जास्त कोण खातं, या प्रश्नाला उत्तर देताना अनन्याने दीपिका पदुकोण सगळ्यात जास्त खवय्यी आहे असा खुलासा केला आहे. यावेळी अनन्या म्हणाली की, “दीपिका सगळ्यात जास्त खात असते आणि चित्रपटाच्या शूटिंगवेळी आम्हा सगळ्यांना तीच खायला मागवत होती.” अनन्याच्या या खुलाशाने सगळेच चकित झाले होते.

‘गहराइयां’ चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. यामध्ये दीपिका पदुकोण आपल्याच जवळच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कथा रंगवण्यात आली आहे. चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या बोल्ड सीनची जोरदार चर्चा रंगली होती.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post