Tuesday, July 23, 2024

लाल मिर्चीचा झटका म्हणजे दीपिका पदुकोणचं नवं फोटोशूट, लाल रंगात दाखवला ग्लॅमरस लूक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘गेहराइयां’ हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, दीपिका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय राहत आहे. अशातच तिने आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दीपिका लाल हॉट चिलीसारखी दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या मनमोहक लूकवर चाहते चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

जान्हवी कपूरही झाली प्रभावित
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका डीप नेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने डार्क शेडची मरून कलरची लिपस्टिक लावली आहे. तसेच मोकळ्या केसांमधील तिची किलर स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दीपिकाच्या या फोटोंवर जान्हवी कपूरनेही (Janhavi Kapoor) कमेंट केली आहे. ज्यावर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

लाल रंगाच्या लेदर ड्रेसने वेधले लक्ष!
यासोबतच दीपिकाने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फोटोशूट दरम्यान मस्ती करताना दिसत आहे. फोटोंमध्ये दीपिका लाल रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये दिसत आहे. दीपिकाच्या ड्रेसमध्ये प्लंगिंग नेकलाइन बनवण्यात आली होती. यामध्ये ती डार्क लाल ओठांमध्ये आणि ऍक्सेसरी नसलेल्या लूकमध्ये दिसत आहे. जान्हवीसोबतच मसाबा गुप्तानेही (Masaba Gupta) दीपिकाच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

एका सीनसाठी दीपिकाने दिले ४८ टेक
दरम्यान, फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने शकुन बत्रा आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. शकुनने एका सीनसाठी ४८ टेक घेतल्याचे दीपिकाने उघड केले. ‘गेहराइयां’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाने चित्रपटाच्या इंटिमेट सीनबद्दल सांगितले. दीपिकाचे म्हणणे आहे की, एका सीनसाठी ४८ टेक देणे सोपे नव्हते.

‘गेहराइयां’ रिलीझसाठी सज्ज!
‘गेहराइयां’ चित्रपटात दीपिका, सिद्धांतसोबत अनन्या पांडे आणि धैर्य करवाही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केले असून, चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा