Friday, May 24, 2024

‘दिल से बुरा लगता है…’, जगाला हसवणाऱ्या देवराज पटेलचा ‘ताे’ शेवटचा व्हिडिओ व्हायरल, चाहते झाले भावूक

मनोरंजन विश्वातील तरुण कलाकार एकामागून एक या जगाचा निरोप घेत आहेत. अशा परिस्थितीत यूट्यूबर आणि कॉमेडियन देवराज पटेल यांच्या निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी देवराजने या जगाचा निरोप घेतला.

देवराज (devraj patel) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, देवराज त्याच्या मित्रासोबत बाईकवर जात असताना एका भरधाव ट्रकने त्याला मागून धडक दिली, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या बातमीने देवराजचे कुटुंबीय आणि त्याच्या चाहत्यांना दु:ख झाले. अशा परिस्थितीत आता देवराजचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मृत्यूच्या काही तास आधी त्याने हा व्हिडिओ बनवला होता.

देवराज पटेल यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत त्याचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पाहून चाहते भावूक होत आहेत. देवराजच्या शेवटच्या इन्स्टा व्हिडीओवर युजर्स त्याला दुःखाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या व्हिडिओमध्ये देवराज म्हणतो, ‘नमस्कार मित्रांनो, देवाने माझा चेहरा असा बनवला आहे की, लोकांना कळत नाही, क्यूट म्हणायचं की, क्यूटिया… बाय.’ या व्हिडिओसोबत देवराजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पण मी क्यूट आहेना मित्रानाे.’ अशात यावर चाहत्यांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devraj Patel (@imdevrajpatel)

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही यूट्यूबर देवराज पटेल याच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. भूपेश बघेलने देवराजचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. देवराजचे इन्स्टाग्रामवर 57 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्यूबवर त्यांचे 4 लाख सबस्क्राइबर्स होते. एवढेच नाही, तर देवराजने भुवन बमसोबत ‘ढिंढौरा’ या वेबसिरीजमध्ये काम केले होते. या सीरीजमधील त्यांचा ‘भाई दिल से बुरा लगता है’ हा डायलॉग खूप गाजला.(devraj patel aka dil se bura lagta hai bhai meme comedian and youtuber last instagram video is viral)

अधिक वाचा:
Birth Anniversary:घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू, जाणून घ्या आरडी बर्मन यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी
प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अन्नातून विषबाधा झाल्याने निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

हे देखील वाचा