धर्मेंद्र यांच्यावर आधारित आहे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’; व्हिडिओ शेअर करत व्यक्त केल्या त्यांनी भावना


बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल पाच वर्षानंतर दिग्दर्शनाकडे वळला आहे. दिग्दर्शक म्हणून करणने त्याच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ५ वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर करण जोहरने या चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शनात एन्ट्री केली आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये रिलीझ झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. करणच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ असे आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या घोषणेनंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे.

या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणाले,” हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काही दिवसांपासून मी ट्विटरवर खूप सक्रिय होतो. मी एकामागोमाग एक ट्वीट केले आणि तुम्ही देखील मला खूप चांगला प्रतिसाद दिला. मी प्रयत्न केला की, मी सर्वांना उत्तर देईल. माझ्याकडून शक्य तितक्या लोकांना उत्तरं देखील दिले. आजच्या घोषणेबद्दल सर्वांना माहीतच आहे. ‘अर्ज है दुआओं के लिए, आपकी ठान ली है धर्म ने आपके फिर कुछ कर गुजरने की’ करण माझ्यासाठी अतिशय खास काहीतरी घेऊन आला आहे. मी देखील माझे संपूर्ण प्रयत्न करणार आहे.”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा एक रोमँटिक प्रेमकथेवर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटात आलिया, रणवीरसोबतच धर्मेंद्र , जया बच्चन आणि शबाना आजमी देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते या सिनेमाला घेऊन खूपच उत्साहित दिसून येत होते. या चित्रपटाचे लेखन इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.