रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि धुरंदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सध्या धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे.
‘धुरंधर’ (dhurandhr)हा चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत 181 कोटी रुपयांची कमाई केली होती. याउलट, ‘धुरंधर 2’ ने पहिल्या दिवसापासून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर पाच दिवसांत तब्बल 519 कोटी रुपयांची कमाई केली. याचा अर्थ असा की, ‘धुरंधर 2′ ने पहिल्या भागापेक्षा अंदाजे 2.86 पट, म्हणजेच एकुण 3 पट अधिक कमाई केली आहे.’धुरंधर’ या पहिल्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 51.60 कोटी रुपयांची सर्वाधिक कमाई केली होती, तर सिक्वेलने तिसऱ्या दिवशी 102.55 कोटी रुपये कमावून एक नवीन विक्रम केला आहे.
‘धुरंधर’ या पहिल्या भागाची एकूण कमाई 1300 कोटी रुपये होती. पण ‘धुरंधर 2’ ज्या गतीने बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे, त्यावरून त्याने केवळ पाच दिवसांत आपला खर्च वसूल केला आहे. तर आता हा चित्रपट नफा कमावत आहे. तज्ञांच्या मते, चित्रपटाचा नफ्याचा दर पहिल्या भागापेक्षा 40% जास्त असण्याची शक्यता आहे. ‘धुरंधरचे आणि तसेच इतर चित्रपटाचेसुध्दा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर किती कमाई करेल हे पाहण्यासारखे राहील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


