[rank_math_breadcrumb]

पहिल्याच दिवशी 150 कोटीचा टप्पा पार, धुरंधर 2’च्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरलं

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. तसेच दिग्गजांकडून धुरंदर चित्रपटांसाठी उत्तम प्रतिक्रिया आहेत आहे. या चित्रपटाने  पहिल्या दिवशी किती कमाई केली, हे जाणुन घेवुयात.

सॅकनिल्कच्या मते, ‘धुरंधर 2ने अधिकृत प्रदर्शनापूर्वीच पेड प्रिव्ह्यू शोमधून 43 कोटी रुपये कमावले होते. आता, प्रदर्शनानंतर, या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली असून, पहिल्याच दिवशी 102.55 कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे, ‘धुरंधर 2’ चे एकूण कलेक्शन आता 150 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ‘धुरंधर 2’ मध्ये रणवीर सिंगने हमजाची,जस्कीरत सिंगची भूमिका साकारली आहे. यावेळी संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा (sara)अर्जुन, राकेश बेदी आणि आर. माधवन यांच्यासोबत अनेक नवीन कलाकार सामील झाले आहेत.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड या चार भाषेत रिलीज करण्यात आला आहे. मात्र, याचा पहिला भाग फक्त हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. धुरंधर मध्ये रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 28 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसरीकडे, ‘धुरंधर 2’ ने केवळ पेड प्रिव्ह्यू शोमधूनच 48 कोटी रुपये कमावले. हे स्पष्ट आहे की, या सिक्वेलने केवळ अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर इतर चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

धुरंदर 2 मध्ये बडे साहेबचा खुलासा, इमरान, सलमान खान नव्हे, या अभिनेत्याने साकारली डॉनची भूमिका