[rank_math_breadcrumb]

धुरंधर’मध्ये अक्षयची एन्ट्री का झाली सुपरहिट? या एंट्री ट्रॅकच्या ओळीचा अर्थ घ्या जाणून

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna)सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियापासून दूर राहणारा अक्षय या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेषतः त्याच्या एन्ट्री सीन्सवर आधारित बहरीनच्या रॅपर फ्लिपेरा यांच्या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडवली आहे. बॉबी देओलच्या अ‍ॅनिमल मधील “जमाल कुडू” प्रमाणे हे गाणेसुद्धा लोकांच्या तोंडी त्वरित बसले आहे.
अक्षयची एन्ट्री असलेला हा ट्रॅक त्याच्या ऊर्जा, खोल बेसलाइन आणि अरबी रॅपच्या व्हाइबमुळे झपाट्याने व्हायरल होत आहे. अनेक जण या गाण्यावर नाचत आहेत, रील्स बनवत आहेत, पण फा9ला म्हणजे नेमके काय, याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. प्रत्यक्षात फा9ला  म्हणजे “मजेचा वेळ”, “धमाल” किंवा “पार्टी” असा अर्थ होतो. म्हणजेच हे गाणे धमाल, निश्चिंत आनंद आणि नृत्याचा उत्सव साजरा करणारे आहे.

गाण्यातील अरबी ओळी मजा, नृत्य आणि ऊर्जेने भरलेल्या भावनांना व्यक्त करतात. अक्षय खन्नाच्या पात्राची भव्य, प्रभावी एन्ट्री या गाण्यामुळे अधिकच उठून दिसते आणि चित्रपटात त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ‘लार्जर दॅन लाईफ’ अपील मिळते.

गाण्यातील काही अरबी ओळी आहेत. अशा—याखी दूस दूस इंदी खोश फासला,याखी तफूज तफूज वल्लाह खोश रकसा,इंदी लक रकसा कविया या अल-हबीब यांचा अर्थ साधारणपणे असा— भाऊ, जोरात नाच, हा धमाल करण्याचा क्षण आहे. तालात सामील हो, हात वर कर आणि खांदे जोरात हलव. हा खास क्षण पूर्णपणे जगा. फा9लाच्या या लयदार धुनीने आणि अक्षयच्या करिष्माई उपस्थितीने चित्रपटाचे तापमान वाढवले असून, हा ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अमजद खानच्या भावाची पत्नी कृतिका देसाई, ‘चंद्रकांता’तील विषकन्या, 57 वर्षांनंतरही फिट आणि आकर्षक