Friday, March 29, 2024

लग्नाआधी संबंध आणि गर्भधारणेवर दिया मिर्झाने केले दिलखुलास वक्तव्य; म्हणाली, ‘याला तेच साजरे करू शकतात, जे…’

प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिया मिर्झाचीही (Dia Mirza) गणना होते. नुकतेच तिने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणे आणि गरोदर राहणे याविषयी खुलेपणाने सांगितले आहे. दिया म्हणाली की, ही वैयक्तिक निवड आहे आणि जे निर्णय घेताना कोणाला घाबरत नाही तेच ते सेलिब्रेट करू शकतात.

दियाने फेब्रुवारी 2021मध्ये बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर लग्नाआधीच तिच्या प्रेग्नंट असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या प्रश्नांची उत्तरेही दियाने बिनधास्तपणे दिली होती. तिने सांगितले होते की, प्रेग्नंट असल्यामुळे तिने लग्न केले नाही. खरं तर लग्नाच्या तयारीदरम्यान तिला गरोदर असल्याची माहिती मिळाली. त्याच वर्षी जुलैमध्ये तिने मुलगा अवयानला जन्म दिला. (dia mirza expressed her views on premarital sex and pregnancy)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दियाने सांगितले की, समाजातील अनेक लोक लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि गर्भधारणा हा ‘अधिकार’ मानतात. ती म्हणाली, “मला वाटते ही वैयक्तिक निवडीची बाब आहे. जी केवळ तेच लोक सेलिब्रेट करू शकतात, जे त्यांच्या वैयक्तिक निर्णय घेताना कोणाला घाबरत नाहीत. मात्र, या विषयावर काही लोकांचे मत वेगळे असू शकते किंवा ते याला चुकीचे देखील मानू शकतात.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिया मिर्झा अनुभव सिन्हा यांच्या आगामी ‘भेड’ चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी दियाने त्यांच्यासोबत ‘कॅश’, ‘दस’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ती तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) ‘धक धक’ चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah), फातिमा सना शेख (Fatima Sana Sheikh) आणि संजना सांघी (Sanjana Sanghi) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तरुण दुडेजा दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. (dia mirza expressed her views on premarital sex and pregnancy)

हे देखील वाचा