×

आता ८० च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येणार, ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मराठीमध्ये अनेक चित्रपट येत आहेत. एकमेकांना टक्कर देत आहेत. अशातच आणखी एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो अनेक चित्रपटांना टक्कर देताना दिसणार आहे. तो म्हणजे ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर पाहता तुम्हाला नक्कीच जुन्या काळातील चित्रपटाचंही आठवण येईल. खरंतर हा चित्रपट गोल्डन एराला ट्रिब्यूट देणारा आहे. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात २० तगडी स्टारकास्ट आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहता हा ८० – ९० च्या दशकातील चित्रपटसृष्टीवर आधारित आहे हा अंदाज येतो. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तिचा वेगवेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच बाकी अनेक कलाकार देखील आपल्याला वेगवेगळ्या महत्वाच्या आणि मजेशीर भूमिकेत दिसणार आहेत. ऍक्शन, रोमान्स असा परिपूर्ण हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे पोस्टर देखील खूपच सुंदर आणि रंगीबेरंगी दिसत आहे. हा पोस्टर पाहून तुम्हाला नक्कीच ८० – ९० दशकातील चित्रपटांची आणि कलाकारांची आठवण येईल.

चित्रपटात दिलीप प्रभाळकर, सागर संत, संस्कृती बालगुडे, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे असे कलाकार दिसत आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट देखील तसाच भन्नाट असेल यात काही वाद नाही. तसेच अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

‘दिल दिमाग और बत्ती’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना ही धम्माल मस्ती आवडली आहे. त्यामुळे सगळेच आता या चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

HAPPY BIRTHDAY | खराब कॉमिक टायमिंगसाठी ऐकावे लागले टोमणे, ४० ऑडिशननंतर शर्मन जोशीला मिळाली ‘या’ चित्रपटात भूमिका

सामाजिक कार्य ते महाभयंकर आजार जाणून घ्या समंथा प्रभूबद्दल माहित नसलेल्या ‘या’ गोष्टी

टायगर श्रॉफला करायचे आहे हॉलिवूडमध्ये काम, म्हणाला मी’ अनेकवेळा ऑडिशन दिलेत पण…’

Latest Post