Thursday, May 23, 2024

…म्हणून नोरा फतेही वारंवार म्हणत आहे पीएम मोदींना धन्यवाद, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावनिक

मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे हजारो स्थानिक लोक हवालदिल झाले आहेत, अनेकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहून नोरा फतेहीला (nora fatehi)  खूप वाईट वाटले आहे. आपल्या देशाची अशी अवस्था पाहून अभिनेत्रीने पीएम मोदींकडे मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर पीएम मोदींनी मोरोक्कोला मदतीचा हात पुढे केला.

नोरा फतेही पीएम मोदींनी दिलेल्या तत्पर मदतीमुळे आनंदित झाली. अशा परिस्थितीत नोराने पीएम मोदींचे आभार मानले. नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ज्यामध्ये तिने पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आणि लिहिले कि, “एवढ्या मोठ्या समर्थनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे आभार. तुम्ही त्या देशांपैकी एक आहात ज्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. मोरोक्कन लोक तुमचे आभारी आहेत. जय हिंद.”

याआधी, मोरोक्कोमध्ये झालेले भीषण नुकसान पाहिल्यानंतर नोराने सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, “मोरोक्कोमध्ये आज काय घडले, किती शहरे त्याचा फटका बसली आहेत, याची बातमी पाहून हृदयद्रावक होते. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. माझ्या मनात एक भीती आहे, मी काळजीत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. मी देवाला प्रार्थना करतो की सर्व काही ठीक आहे. मी देवाचे आभार मानतो की आमचे सर्व लोक चांगले आहेत. या नैसर्गिक घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. अलैहफद कोम या रब”

आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेल्या मोरोक्कोमध्ये ८ सप्टेंबरला ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या नैसर्गिक आपत्तीत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी
‘आदिपुरुष’नंतर प्रभास साकारणार भगवान शंकराची भूमिका, नवीन चित्रपटाची केली घोषणा
Happy birthday Mitali | सिद्धार्थ नाही तर ‘हे’ आहे मितालीचे पहिले प्रेम, पाहा कशी पडली अभिनेत्याच्या प्रेमात

हे देखील वाचा