Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड साउथ विरुद्ध बॉलिवूडविषयी रोहित शेट्टीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमचेच नाही, त्यांचेही…’

साउथ विरुद्ध बॉलिवूडविषयी रोहित शेट्टीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमचेच नाही, त्यांचेही…’

बॉक्स ऑफिसवर 2022मध्ये अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्याचबरोबर ‘कंतारा‘, ‘केजीएफ चॅप्टर 2‘, ‘आरआरआर‘, ‘कार्तिकेय 2‘ या सारख्या अनेक साऊथ चित्रपटांना हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून दक्षिण भारतीय चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, अनेक बॉलीवूड कलाकार याला सहमत नाहीत. आता या यादीत रोहित शेट्टीचेही नाव जोडले गेले आहे. सध्या रोहित त्याचा आगामी चित्रपट सर्कसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंग स्टारर हा चित्रपट या शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर)ला रिलीज होत आहे. त्यामुळेच रोहित आणि चित्रपटाचे बाकीचे स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान रोहित (rohit shetty) याला बॉलीवूड विरुद्ध साऊथ बद्दल विचारण्यात आले तेव्हा तो या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलला. तो म्हणाला की, “बॉलीवूडप्रमाणेच दक्षिणेतही काही चित्रपट हिट झाले आहेत. दक्षिण सिनेसृष्टीनेही अनेक बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.” रोहित म्हणाला, “गेली 2 वर्षे आम्ही महामारीतून गेलो आहोत. आमचे सर्व मोठे चित्रपट एकतर सुरू झाले नाहीत किंवा बनू शकले नाहीत. साऊथमध्ये रिलीज झालेले चित्रपट आधीच बनले आहेत. महामारीनंतर ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘भूल भुलैया 2’, ‘दृश्यम 2’ या सारख्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. त्यामुळे आमचे चित्रपट चांगले चालले नाहीत असे नाही.”

यादरम्यान त्यांनी ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांची नावे घेत बॉलीवूडमधील कामगिरीची गणना केली. ताे पुढे म्हणाला, “तिथे तुम्ही पाहाल तर तुम्हालाही दक्षिण उद्योगातील लोक संपावर गेलेले दिसतील कारण, काहीही चालू नव्हते. आम्हाला नेहमी वाटते की, दुसरीकडे गवत अधिक हिरवे आहे, परंतु तसे नाही.” रोहित पुढे म्हणाला की, “महामारीमुळे दिग्दर्शक त्यांचे चित्रपट आणू शकले नाहीत. त्यामुळे बॉलीवूडचा टप्पा यंदा निस्तेज दिसला. मात्र, पुढील वर्षी परिस्थिती अधिक चांगली होईल,” अशी आशा त्याने व्यक्त केली.

राेहीत शेट्टी यांने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटा विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘सिंगम’, ‘गाेलमाल’, ‘गाेलमाल5’, ‘गाेलमाल 3’ यासारखी दमदार चित्रपट सिनेसृष्टीला दिली. (director rohit shetty talks about south vs bollywood said they also suffered back to back flops)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजय अन् सैफचे 1999 मधील न पाहिलेले फोटो, अभिनेत्याने पोस्ट करत दिला आठवणींना उजाळा

दुबई पोलिसांच्या चौकशीवर उर्फी जावेदचे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्या कपड्यांमुळे…’

हे देखील वाचा