Sunday, June 8, 2025
Home टेलिव्हिजन बिग बॉसमध्ये एन्ट्री करणाऱ्या साजिदचे वादाशी घनिष्ठ संबंध, 15 वर्षांच्या वयात केली होती जेलवारी

बिग बॉसमध्ये एन्ट्री करणाऱ्या साजिदचे वादाशी घनिष्ठ संबंध, 15 वर्षांच्या वयात केली होती जेलवारी

टेलिनव्हिजन दुनियेतील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘ हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाच्या चर्चा सुरू असून यामध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींची नावे देखील खूपच चर्चेत होती. शनिवारी (दि. 1 ऑक्टेबर ) या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यामध्ये अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले, ज्यांच्या चर्चा रंगल्याच नव्हत्या. मात्र, एका स्पर्धकाने ‘बिग बॉस’मध्ये धमाकेदार एन्ट्री करुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो स्पर्धक दुसरा- तिसरा नसून बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

टीव्हीवरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस 16’ (bigg boss 16) याच्या स्पर्धकांचे चेहरे समोर आले आहेत. त्यापैकी सर्वांचेच लक्ष वेधणारा स्पर्धक म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान (Farhan Khan) हिचा भाऊ साजिद खान (Sajid Khan) हा देखील या कार्यक्रमाचा भाग होणार आहे. त्यामुळे सलमान खान हा देखील आश्चर्यचकित होतो आणि त्याला वाटते की, तो थट्टा करत आहे. मात्र, ही गोष्ट खरी आहे की, साजिद खानही बिग बॉसच्या घरामध्ये बंद होणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण साजिदच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने ‘डरना जरुरी हैं’, ‘हे बेबी’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल2’ सारख्या गाजणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, याचे आयुष्य खूपच वादग्रस्त आणि खडतर होते. साजिद दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिचा छोटा भाऊ आहे. साजिद सहा वर्षाचा असतानाच त्याचे आई-वडील वेगळे झाले होते. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. एवढ्या कठीण परिस्थितीतून या भाऊ बहिणींनी आपली ओळख बनवली आहे. साजिदचे वडील चित्रपट निर्माता होते. मात्र, त्यांना चित्रपटामध्ये अपयश आल्यामुळे त्यांना दारुचे व्यसन लागले होते. साजिद 14 वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलाचे निधन झाले होते. त्यामुळे साजिदचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते.

वडिलांच्या मृत्युनंतर साजिदचे आयुष्य खूपच विस्कळीत झाले होते. तो अभ्यासामध्ये खूपच कच्चा होता, त्यामुळे तो दहावीमध्ये तीन वेळा नापास झाला होता. साजिद 15 वर्षांचा असताना तो जेलमध्ये गेला होता. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी आणि माझा मित्र आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा माझा मित्र म्हणाला की, मी रेल्वे ट्रॅकच्या मधूनच घरी जाणार आहे. तेव्हा आम्हाला एका हवालदाराने पकडले होते. मी पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा दांडीने मारुन त्यांनी रात्रभर आम्हाला जेलमध्ये बंद केले होते. सकाळी एक पोलीस अधिकारी आमच्या बोलण्यावरुन इम्प्रेस झाला आणि त्याने आम्हाला सोडून दिले.”

साजिदला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची ईच्छा होती. त्याचा हाच छंद त्याला बॉलिवूडकडे घेऊन आला. त्याने आपल्या करिअरची सरुवात दूरदर्शनवरील प्रसारित होणाऱ्या ‘मैं भी डिटेक्टीव’ या कार्यक्रमापासून केली होती. यानंतर त्याने 1996 मध्ये संगीताचा कार्यक्रम ‘इक्के पे इक्का’ याचे सूत्रसंचालन केले होते. हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध होता त्यामुळे याचे नाव ‘द लिम्का बुक ऑफ वर्ल्ड’ या पुस्तकात नोंंद केले होते. यानंतर त्याने आपल्या आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमध्ये एवढे सुरहिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमवले. मात्र, लहानपण वादग्रस्त असल्यामुळे त्याला सतत अपमानही सहन करावा लागला होता. हा प्रसिद्ध दिग्दर्शक इंडस्ट्रीमध्ये वादग्रस्त या नावाने ओळखला जातो.

काही दिवसांपूर्वी ‘मी टू’ ही मोहीम राबवली होती, तेव्हा साजिद खानचे नाव खूपच बदनाम झाले होते. सलोनी चोप्रा, प्रियांका बोस, अहना कुम्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर लैगिंक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपामुळे साजिदला ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या शूटिंगमधून काढले होते. यानंतर “याचे मुलींसोबत वागणे बरोबर नाही. तो सेटवर कोणत्याही मुलीला त्रास देत असतो आणि घाणेरडे जोक मारत असतो. माहिलांप्रती त्याचे वागणे योग्य नाही,” असा आरोप अभिनेत्री बिपाशा बासू  (Bipasha Basu) हिने लावला होता. दिया मिर्झा (Dia Mirza) या अभिनेत्रीनेही साजिबद्दल बोलत असताना सांगितले होते की, “तो खूपच निर्लज्ज प्रकारचा माणूस आहे. तो मुलींसोबत घाणेरड्या प्रकारचे मजाक करत असतो.”

त्यासोबतच साजिदचे नाव जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) या अभिनेत्रीशीही जोडले गेले आहे. जॅकलिन आणि साजिद खूप दिवस एकमेकांना डेट करत होते.  मात्र, साजिदच्या वागणूकीमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आता साजिद बिग बॉसच्या घरात आपली कोणती छाप सोडेल हे पाहणे खूपच रंजक असेल. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात काय होईल, हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्येत खराब म्हणून आधी झाला बोभाटा, आता फ्रान्सच्या राजधानीत जलवा दाखवताना दिसली ‘मस्तानी’

फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते

हे देखील वाचा