Friday, March 29, 2024

आधी ओकली गरळ, आता ‘पठाण’चे यश पाहून बदलले अग्निहोत्रींचे सूर; म्हणाले, ‘शाहरुखने सिद्ध केलं…’

चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘पठाण‘ सिनेमाने बॉयकॉट ट्रेंडची बोलती बंद केली आहे. सिनेमावर बंदी घालणाऱ्या लोकांनीही आता यू-टर्न घेत तोंडभरून कौतुक केले आहे. कंगना रणौतसह बॉलिवूड कलाकारांना निशाण्यावर धरणाऱ्या दिग्गजांनीही ‘पठाण’चे गोडवे गायले आहेत. अशात ‘द काश्मीर फाईल्स‘ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचाही या यादीत समावेश झाला आहे. विवेक यांनी ‘पठाण’ला रिलीजपूर्वी विरोध दर्शवला होता. मात्र, आता त्यांचे सूर बदलले असून त्यांनी पठाणची प्रशंसा केली आहे.

शाहरुखचे कौतुक
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे नुकतेच एका पॉडकास्टमध्ये सामील झाले होते. यावेळी विवेक यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) याची प्रशंसा तर केलीच, शिवाय त्याच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचेही गुणगान गायले. विवेक म्हणाले की, “पठाण सिनेमा शाहरुख खानच्या चाहत्यांच्या कृपेने यशस्वी झाला आहे. शाहरुखने सिद्ध केले आहे की, त्याची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्याने ज्याप्रकारे सिनेमाच्या रिलीजपूर्वी त्याची जबाबदारी घेतली, ती प्रशंसनीय आहे. शाहरुख म्हणाला होता की, सिनेमा चालला नाही, तर ती त्याची जबाबदारी आहे.”

गाण्यावर केले होते वक्तव्य
शाहरुखचे गुणगान गाण्यापूर्वी विवेक अग्निहोत्री सिनेमाच्या रिलीजपूर्वी वेगळी वक्तव्ये करत होते. त्यांनी पठाणच्या ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरून सुरू झालेल्या वादावरही मत मांडले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, बेशरम रंगसारखे गाणे भारतीय संस्कृती बिघडवण्याचे काम करतात. सिनेमा रिलीजपूर्वी गाण्यांमुळे एकच खळबळ माजली होती. विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमा बॉयकॉटच्या निशाण्यावर असताना हे वक्तव्य केले होते.

अशात विवेक अग्निहोत्री यांचे सूर बदलले आहेत. ‘पठाण’ सिनेमाच्या यशाने शिखर गाठले आहे. शाहरुखच्या या सिनेमाने 21 दिवसात जगभरात 953 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यातील 475 कोटी रुपये कलेक्शन हिंदी पट्ट्यातून झाले आहे. 250 कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने बजेटपेक्षा 88 टक्के जास्त कमाई केली आहे. तसेच, अजूनही हा सिनेमा चित्रपटगृहात राडा घालताना दिसत आहे. पठाण सिनेमाने ‘बाहुबली 2’चादेखील विक्रम मोडला आहे. (director vivek agnihotri praise shahrukh khan after pathaan proved massive hit on box office)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो

हे देखील वाचा