Friday, March 29, 2024

एकेकाळी ‘या’ अभिनेत्यावर फुल्ल क्रश होती दिशा पटानी, त्यामुळं अपघातालाही पडलीय बळी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते, परंतु सध्या ती तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी ती खूप व्यस्त आहे. दरम्यान, ती तिच्या क्रशबद्दल बोलली आहे.

दिशा ‘या’ अभिनेत्यावर क्रश होती
अलीकडेच दिशा पटानीने एक मुलाखत दिली, ज्यात तिने तिच्या क्रशचे नाव सांगितले आहे. अभिनेत्री म्हणाली की, “माझ्या शालेय दिवसात मला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर खूप आवडायचा आणि त्याच्यामुळेच माझे अनेकदा अपघात झाले आहेत.” अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या शहरात रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) एक मोठे पोस्टर होते, जे तिथून ये-जा करताना ती नेहमी पाहत असे आणि या प्रकरणात ती अनेकदा रस्त्यात कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी धडकली. (disha patani was crush on ranbir kapoor shares story)

याबद्दल अभिनेत्रीला रणबीर कपूरला सांगायचे आहे
संभाषणादरम्यान दिशा पटानीला विचारण्यात आले की, तुम्ही कधी रणबीर कपूरला याबद्दल सांगितले आहे का? तर अभिनेत्री म्हणाली, नाही, पण तिला नक्कीच सांगायचे आहे आणि ती तसे करेलही.

‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार ‘हे’ स्टार्स
विशेष म्हणजे, दिशा पटानी ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा