×

लवकर शोमध्ये परतणार दयाबेन! मात्र ‘TMKOC’च्या निर्मात्यांना मान्य कराव्या लागतील अभिनेत्रीच्या ‘या’ ३ अटी

टेलिव्हिजन शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दयाबेन लवकरच शोमध्ये परत येऊ शकते. होय, आगामी काळात दयाबेन टीव्हीवर गरबा करताना दिसणार आहे. मात्र यासाठी शोच्या निर्मात्यांना दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या (Disha Vakani) काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत.

शोमध्ये परतू शकते दयाबेन
दयाबेन म्हणजेच दिशा वकानी टीव्हीचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बऱ्याच दिवसांपासून दिसलेली नाही. ती प्रसूती रजेवर गेली होती आणि परत आलीच नाही. दरम्यान, दिशा आता पुन्हा मालिकेत परतत असल्याचं अनेकदा ऐकायला मिळत होतं. पण चाहत्यांची निराशा झाली. दिशा वकानीचा पती मयूर यानेही अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की त्याची पत्नी शोमध्ये परतणार नाही. पण आता दिशा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. (Disha Vakani will be back on taarak mehta ka ooltah chashmah with these conditions)

‘या’ आहेत अटी
जर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी दया बेनची फी म्हणजेच एपिसोड १.५ लाख वाढवली आणि जर दिशाची दिवसाला फक्त ३ तास काम करण्याची अट मान्य केली, तर ती कामावर परत येईल. माध्यमातील वृत्तानुसार, दिशाचा पती मयूर शोच्या मेकर्सशी बोलणी करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर आपल्या मुलासाठी वैयक्तिक पाळणाघरही बनवावे, अशी दिशा आणि तिच्या पतीची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. तसेच एक आया देखील नियुक्त केली पाहिजे, जी नेहमी त्या मुलीसोबत असावी, असे या जोडप्याचे म्हणणे आहे.

चाहते पाहतायेत वाट
या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आता या शोचा भाग नसली, तरी चाहत्यांना तिची आठवण आहे. दिशा गेल्या अनेक वर्षांपासून या शोमध्ये दिसलेली नाही आणि निर्मात्यांनी तिच्या जागेवर कोणाचीही बदली केलेली नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ दिशा वकानीच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला आहे.

हेही वाचा-

Latest Post