Saturday, April 12, 2025
Home अन्य चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिव्या दत्ताने ‘इश्क मे जीना इश्क मे मरना’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. दिव्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतू, तरीही तिचे नाव प्रसिद्धीपासून दूरच राहिले. ‘दिल्ली ६’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘बदलापूर’ या चित्रपटांमधून दिव्याच्या दमदार अभिनय कौशल्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपटात किती मिनिटांची भूमिका आहे, याचा कधीच तिने विचार केला नाही. तर ती भूमिका किती प्रभावशाली आहे, याला तिने नेहमीच प्राधान्य दिलं.

दिव्याला खरी ओळख ‘शहीद ए मोहब्बत’ या पंजाबी चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने एका शीख पुरुषाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिव्याला शब्बोच्या भूमिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली.

दिव्याचा जन्म 25 सप्टेंबर 1977 साली लुधियानामध्ये झाला. दिव्या तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग पाहूयात तिच्याविषयी खास गोष्टी.

दिव्या एका पंजाबी कुटुंबातील आहे. ती जेव्हा सात वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर दिव्याच्या आईने तिचा सांभाळ केला. दिव्याची आई डॉ. नलिनी दत्ता या सरकारी अधिकारी होत्या. १९८४ साली पंजाबमध्ये दंगल झाली. त्यावेळी ती खूप घाबरली होती. परंतू, ती प्रभावित झाली नाही. दिव्याला लहानपणी चित्रपटसृष्टी खूप आवडायची. तिच्या या आवडीविषयी बोलताना दिव्या म्हणाली की, “जेव्हा मी चार वर्षांची होते, तेव्हा मला वाटायचे की, मी अभिनय करू शकते. त्याचवेळी, अमिताभ बच्चन यांचा ‘डाॅन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘खाइके पान बनारसवाला’ गाणे त्या काळी खूप चर्चेत होते आणि त्यातील डान्स पाहून मी आईची ओढणी घेऊन कंबरेला बांधून तसेच खूप मेकअप करून डान्स करायचे.”

माध्यमांशी बोलताना दिव्या म्हणाली होती की, “जेव्हा मी माझ्या कोणत्याही जुन्या पात्राची पुनरावृत्ती करते, तेव्हा मला कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जावे लागत नाही किंवा मी चिंताग्रस्त होत नाही.” दिव्या पुढे बोलताना म्हणाली की, “मी स्वत: ला भाग्यवान समजते, जेव्हा मी अशा दिग्दर्शकांसोबत काम करायचे ज्यांनी मला अशा भूमिकांच्या ऑफर दिल्या, ज्या मी यापूर्वी कधीही केल्या नव्हत्या. पण जर मी पूर्वीप्रमाणेच पात्र निभावत असेल, तर काहीच हरकत नाही.”

दरम्यान, दिव्या ‘वीरगती’, ‘इसकी टोपी उसके सर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘गिप्पी’, ‘संविधान’, ‘बागबान’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ‘मिल्खा सिंग’मध्ये तिने मिल्खाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. दिव्या अलीकडेच ‘शीर-कोरमा’ चित्रपटात दिसली होती. ‘धाकड’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. ‘धाकड’ चित्रपटामध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. दिव्या यात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्लासिक गाण्याची वाट लावू नको’ म्हणणाऱ्या फाल्गुनी पाठकला नेहा कक्करने दिले सडेतोड उत्तर

श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
रुपाची खान, दिसती छान! अरबाजची गर्लफ्रेंड आहे खूपच संंदर अन् ग्लॅमरस; अशी केली बॉलिवूड एन्ट्री

हे देखील वाचा