रुपाची खान, दिसती छान! अरबाजची गर्लफ्रेंड आहे खूपच संंदर अन् ग्लॅमरस; अशी केली बॉलिवूड एन्ट्री

0
84
Giorgia-Andriani
Photo Courtesy: Instagram/giorgia.andriani22

अभिनेता अरबाज खान आपल्या रिलेशनमुळे नेहमी चर्चेत असतो. अरबाज आणि त्याची एक्स पत्नी मलायका अरोरा यांनी 2017मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अरबाजचा जीव जॉर्जिया एंड्रियानी या अभिनेत्रीवर जडलाय. तो तिला अनेक वर्षांपासून डेट करत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तिचे बोल्ड फोटोज शेअर करत असते. चला तर आज आपण अरबाजच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेऊया…

सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या फोटोची झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहात असतात. त्यापैकीच अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) ही परदेशी अभिनेत्री आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या नवीन अंदाजातले फोटो शेअर करत असते.

कोण आहे जॉर्जिया एंड्रियानी?
जॉर्जिया एंड्रियानी ही एक इटॅलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सलमान खान (Salman Khan) याचा भाऊ अरबाज खानची गर्लफ्रेंड असून तिने बॉलिवूडमध्ये अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे, पण यावेळी ती अरबाजला डेट करत असल्यामुळे ती खूपच चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

अरबाज आणि जॉर्जिया यांचे अफेअर
अरबाजने याची एक्स पत्नी मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्यासोबत 19 वर्षाचा संसार मोडला. तसेच, दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. त्याच्यानंतर त्याने जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करण्यास सुरुवात केली. त्याने जॉर्जियासोबतचे नाते मीडियासमोर लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तिने सोशल मीडियाद्वारे दोघांचे फोटो देखील शेअर केले होते. त्यामुळे त्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते आणि आता ते दोघे लग्न करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

जॉर्जिया एंड्रियानीचे लहानपण
जॉर्जिया एंड्रियाना ही एक इटलीची अभिनेत्री आहे. तिचे लहानपण आणि कॉलेजचे शिक्षण लंडन आणि इटलीमध्ये पूर्ण झाले आहे. तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. यासोबतच तिने अनेक जाहिरातीसाठी फोटोशूटही केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांना बेधुंद करणारा अमलाचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी
तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here