ज्या चित्रपटाची प्रेक्षकांना खूप प्रतिक्षा लागली आहे. तो मार्वल स्टुडिओजचा बहुचर्चित ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ चित्रपट आता एका महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची बराच काळ वाट पाहावी लागली होती. अलिकडेच काही दिवसांपूर्वी मार्वल स्टुडिओजने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटात बेनेडिक्ट कंबंरबैचने प्रमुख भूमिका साकारली असून, हा चित्रपट भारतात ६ मेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मार्वल मासिकाच्या डॉक्टर स्ट्रेंज या पात्रावर आधारित आहे. ही माहिती मार्वलने त्यांच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. आता या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मार्वल स्टुडिओच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ज्या दिवशी मार्वलने ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ची घोषणा केली, त्या दिवसापासून चाहते ‘डॉक्टर स्ट्रेंज’च्या या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. मात्र, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ ६ मे २०२२ रोजी भारतात सहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे. मार्वलने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे की, “डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस ६ मे रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
दरम्यान चित्रपटात प्रेक्षकांना मल्टीवर्स ट्रॅक पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे जग संकटात येईल. हा चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या ‘डॉक्टर स्टॅंज’चा दुसरा भाग आहे. सॅम रैमी दिग्दर्शित, मल्टीवर्स ऑफ मॅडनेसमधील डॉक्टर स्ट्रेंजमध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच, चिवेटेल इजिओफोर, एलिझाबेथ ओल्सेन, बेनेडिक्ट वोंग, जोशिटेल गोमेझ, मायकेल स्टॅहलबर्ग आणि रॅचेल मॅकअडम्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –