Wednesday, March 19, 2025
Home अन्य दुःखद! दक्षिण कोरियन बँड सेव्हेंटीनचा रॅपर वोनवूच्या डोक्यावरून हरपले मायेचे छत्र

दुःखद! दक्षिण कोरियन बँड सेव्हेंटीनचा रॅपर वोनवूच्या डोक्यावरून हरपले मायेचे छत्र

दक्षिण कोरियन बँड सेव्हेंटीनचा रॅपर वोनवूच्या (Wonwoo) आईचे निधन झाले आहे. याबाबत माहिती देताना प्लेडिस एंटरटेनमेंटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वोनवूची आई दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होती. वोनवूचे कुटुंब आणि बँड सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्लेडिस एंटरटेनमेंटने सांगितले की, “वोनवू सध्या अंत्यसंस्कार हॉलमध्येच आहे. या कठीण काळात आम्ही तुमची साथ आणि समर्थन मागत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.” (seventeen s member wonwoo s mother lost her life due to illness)

वोनवूला एक लहान भाऊ देखील आहे, ज्याचे नाव जिओन बोह्युक आहे. ‘१७ कॅरेट’, ‘लव्ह अँड लेटर’, ‘डायरेक्टर्स कट’ आणि ‘वी मेक यू’ यासह अनेक अल्बमसाठी दक्षिण कोरियन बँड सेव्हेंटीन ओळखला जातो.

वोनवूच्या आईच्या निधनानंतर वोनवूसोबत काम करणाऱ्या गायक जोशुआनेही त्याच्या आईची आठवण काढताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले. जोशुआने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मी अमेरिकेचा आहे, मी वोनवूच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवला आहे. कोरियात आल्यानंतर मी अनेकदा त्याच्या घरी राहिलो. यावेळी वोनवूच्या कुटुंबाने माझी खूप काळजी.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा