Monday, April 15, 2024

तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात ? लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu) सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी असा दावा करण्यात आला होता की, अभिनेत्रीने मॅथियास बोईशी लग्न केले आहे. मात्र, याला अधिकृतपणे कुठूनही दुजोरा मिळालेला नाही. लग्नाच्या बातमीनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तापसीच्या लग्नाचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या व्हिडिओबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तापसीच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी वधूच्या पोशाखात दिसत आहे. अभिनेत्री तिच्या एंट्रीदरम्यान नाचताना दिसत आहे, तर मॅथियास स्टेजवर तिची वाट पाहत आहे.

Taapse Pannu Wedding Video
byu/PinPitiful inBollyBlindsNGossip

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तापसी पन्नू ब्राइडल गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री तिच्या एंट्रीदरम्यान डान्स करताना दिसली, तर मॅथियास बोई स्टेजवर तिची वाट पाहत होता.

तापसीच्या बाजूने कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, ना कोणताही फोटो किंवा कोणताही व्हिडिओ. आपण विवाहित असल्याचे तिने अजूनहीउघड केलेले नाही. मात्र, ही बातमी बऱ्याच दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये येत आहे.

अखेर, तापसी पन्नूचा शूटमधील वेडिंग लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा तिचा पहिला लग्नाचा व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर समोर आला आहे, जो स्वत: अभिनेत्रीने शेअर केलेला नसून तो लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि मथियास बॉयने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये सात फेऱ्या मारल्या होत्या. लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ अभिनेत्रीने स्वतःच्या हाताने केले आयुष्य उध्वस्त, पतीला सोडून बहिणीचा मुलगा घेतला दत्तक
पहिल्या कमाईत शर्मिला टागोर यांनी केली होती सोन्याची खरेदी, मग या दिग्दर्शकाने सल्ला

हे देखील वाचा