जॅकलिन-नोराच नाही, तर सुकेश चंद्रशेखर प्रकरणात होणार आणखी ५ बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी


बॉलिवूडमध्ये सध्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. सुकेशने बॉलिवूडच्या बड्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात अडकवून फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यापूर्वी या प्रकरणात जॅकलिन आणि नोरा यांची नावे समोर आली होती, मात्र आता आणखी काही अभिनेत्रींची नावे आहेत. ज्यांना सुकेशने आपल्या जाळ्यात अडकवले आहे. आता ईडीने जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) व्यतिरिक्त आणखी ५ अभिनेत्रींची नावे घेतली आहे, ज्यांची या प्रकरणात चौकशी केली जाईल.

अन्य पाच अभिनेत्रींची करण्यात येणार चौकशी
या अभिनेत्रींकडून त्यांना सुकेश यांची वास्तविकता माहीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे, असे ईडीने यावेळी सांगितले. या प्रकरणी ईडी लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी ५ अभिनेत्रींची नावे उघड करणार आहे. या प्रकरणात त्यांनाही साक्षीदार म्हणून हजर करण्यात येणार आहे. सुकेश चंद्रशेखर याच्याकडून भेटवस्तू का मिळाल्या, असा सवालही त्यांना करावा लागेल. जॅकलिन आणि नोराला सुकेशकडून भेटवस्तू मिळाल्या आणि त्यांची किंमत किती, याचाही तपास सुरू आहे.

सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय आता या प्रकरणात त्याची एक एक काळी कृत्ये उघड होत आहेत. सुकेशसोबत जॅकलिनचे काही फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक पोझमध्ये दिसत आहेत. जॅकलिन जेव्हापासून ईडीच्या चौकशीत भाग घेत आहे. तेव्हापासून तिच्या अडचणी वाढल्या आहेत. तिला देशाबाहेर जाण्याचीही परवानगी नाही. त्यामुळेच ती सलमान खानच्या ‘दबंग टूर’चा भागही बनू शकली नाही.

नोराने ईडीला दिले स्पष्टीकरण
त्याचवेळी बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या नोरा फतेहीचे फोटोही समोर आले आहेत. याप्रकरणी ईडीने नोराचीही सखोल चौकशी केली आहे. यामध्ये नोराने सांगितले आहे की, ती सुकेश चंद्रशेखरला आधीपासून ओळखत नव्हती आणि एका कार्यक्रमादरम्यान ती सुकेशची पत्नी लीनाला भेटली होती. त्याने नोराला महागड्या भेटवस्तू दिल्या. त्यादरम्यान ती सुकेशशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलली आणि ती त्याला कधीच भेटली नाही.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!