Oops! भरस्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत होती नोरा फतेही, अचानक उडाला ड्रेस अन् बघतच राहिले प्रेक्षक


अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) या दिवसांत तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्यात मग्न आहे. सतत आपले ग्लॅमरस व हॉट फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच तिचे डान्स व्हिडिओही जबरदस्त असतात. नोरा बेफिकीरपणे डान्स करते आणि अगदी मस्त स्टाईलमध्ये सगळंच विसरून जाते. अशातच नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रेक्षकांसमोर डान्स करताना दिसत आहे. पण डान्स करत असताना अचानक असे काही घडले, ज्यामुळे अभिनेत्री ‘oops moment’ची शिकार झाली.

नोरा फतेहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे, ज्यामध्ये ती प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, नोराच्या आजूबाजूला लोक उभे आहेत आणि ती त्यांच्या मध्ये डान्स करत आहे. डान्स करताना, नोरा तिचे अप्रतिम मुव्ह्ज दाखवत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना तिच्यावरून नजर हटविणे कठीण झाले होते. तेव्हा डान्स करताना असे काही घडले, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. (nora fatehi dress blown up amid dance in public nora fatehi oops moment video)

लाइव्ह डान्स परफॉर्मन्सदरम्यान नोरा फतेहीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. ड्रेसच्या बाजूला स्टायलिश कट होता. डान्स करताना नोरा इतकी गुंग झाली होती की, तिचा स्टायलिश ड्रेस कधी उडाला आणि तिचे अंडरगारमेंट्स कधी दिसू लागले ते तिला कळलेच नाही. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही तिचा ड्रेस फिक्स करतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवरून नजर हटवू शकत नाहीयेत.

अलीकडेच नोराचा ‘डान्स मेरी रानी’ हा म्युझिक अल्बम रिलीझ झाला, ज्यात ती जलपरीच्या रूपामध्ये दिसली. यात तिच्यासोबत गुरू रंधावाची आकर्षक केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली. यामुळेच बघता बघता गाण्याने लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!